म्हाडा विजेत्यांचा शेवटचा हप्ता माफ...दिवाळीपर्यंत घरे मिळणार... डॉ. श्रीकांत शिंदे

खासदार डॉ. शिंदे MP Shrikant Shinde यांच्यासह म्हाडाचे Mhada सभापती माजी आमदार विनोद घोसाळकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन Nitini Mahajan यांनी शिरढोण आणि खोणी या दोन्ही ठिकाणी भेट देत सदनिका विजेत्यांची भेट घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
MHADA Visit MP Shrikant Shinde
MHADA Visit MP Shrikant Shindesarkarnama

डोंबिवली : म्हाडा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खोणी व शिरढोण येथे घरकुल योजना उभी रहात आहे. याठिकाणी 2018 साली लॉटरी लागल्यानंतर पूर्ण हप्ता भरून देखील लाभार्थ्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. या लाभार्थ्यांना दिवाळीत घराचा ताबा मिळेल तसेच 10 टक्के सवलत देखील मिळेल, असे आश्वासन कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिले.

लॉटरी विजेते व म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांची त्यांनी भेट घेतली. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडून अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रत्येकी 2 हजार सदनिका डोंबिवली जवळील खोणी व शिरढोन गावात बांधण्यात येत आहेत. या घरांची लॉटरी 2018 मध्ये काढण्यात आली होती. 2021 मध्ये या घरांचं पझेशन लॉटरी विजेत्यांना देण्यात येणार होतं. मात्र त्यावेळी घरं पूर्णपणे तयार नसल्यानं पझेशन लांबणीवर पडलं.

MHADA Visit MP Shrikant Shinde
'हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे यांनी भरले आणि मुख्यमंत्री ठाकरे झाले!'

दुसरीकडे म्हाडाचे पैसे स्लॅब वाईझ नव्हे, तर 6 हप्त्यात भरावे लागत असल्यानं विजेत्यांनी सर्व पैसे भरले, तरी पझेशन मात्र मिळालं नव्हतं. त्यामुळं एकीकडे बँकेचं वाढतं व्याज आणि दुसरीकडे घराचं भरावं लागणारं भाडं, त्यात लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीची कोसळलेली कुऱ्हाड अशा संकटात लॉटरी विजेते सापडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी या सदनिका विजेत्यांनी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.

MHADA Visit MP Shrikant Shinde
रोहित पवारांनी आम्हाला अहिल्यादेवींच्या जयंतीची परवानगी मिळू दिली नाही : राम शिंदे

त्यानुसार सोमवारी खासदार डॉ. शिंदे यांच्यासह म्हाडाचे सभापती माजी आमदार विनोद घोसाळकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी शिरढोण आणि खोणी या दोन्ही ठिकाणी भेट देत सदनिका विजेत्यांची भेट घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यानंतर सदनिका विजेत्यांचा शेवटचा 10 टक्क्यांचा हप्ता माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिलं. तर 10 टक्के हप्ता माफ करण्यासाठी आपण प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवणार असून दिवाळीपर्यंत या सर्व लॉटरी विजेत्यांना त्यांच्या हक्काच्या घरांचं पझेशन देण्याचं आश्वासन म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com