कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ दादा मोते यांचं निधन - EX MLA Ramnath Dada Mote Died due to Illness | Politics Marathi News - Sarkarnama

कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ दादा मोते यांचं निधन

अजय दुधाणे 
रविवार, 23 ऑगस्ट 2020

कोकण मतदार संघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार रामनाथ मोते सर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. श्री. मोते शिक्षक मतदार संघातून दोन वेळा निवडुन आले होते. 

उल्हासनगर : कोकण मतदार संघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार रामनाथ मोते सर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. श्री. मोते शिक्षक मतदार संघातून दोन वेळा निवडुन आले होते. 

मात्र रामनाथ दादा मोते यांचे कर्तृत्व व कार्य प्रचंड होते.  कोकण मतदार संघात त्यांना सर्वजण ओळखत.  एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन शिक्षण व शिक्षकांसाठी वाहून घेतले ते विस्मयकारक होते.  विधान परीषदेत आवाज उठविणे इतकेच नव्हे तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, उपोषण करणे या सर्व आयुधांनीशी ते शिक्षकांच्या न्यायच्या हक्कांसाठी न्याय मिळेपर्यंत ते लढतच राहिले.

त्यांच्या १२ वर्षाच्या आमदारीच्या कारकिर्दीत त्यांनी एक आदर्श अभ्यासू व तळमळीचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले. विधान परीषदेतील त्यांच्या कार्याचा अहवाल ते दरवर्षी "मी आमदार रामनाथ मोते बोलतोय'' या ग्रंथवत पुस्तकातून देत असंत. आता मोतेसर शिक्षक आमदार नसले तरी त्यांची शिक्षकांसाठी सतत धडपड सतत सुरू असायची. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांचं मुलुंड मधील फोरटीज रुग्णालयात निधन झाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख