लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही; मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यातील उपाययोजनांचा आढावा - CM Uddhav Thackeray said will not unlock activities hastily | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही; मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यातील उपाययोजनांचा आढावा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. या वेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांच्यासमवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते

ठाणे  : जूनपासून मिशन बिगिन अगेन सुरू झाले आहे. त्यानुसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील, त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत, याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरू केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे; पण ज्या गोष्टी सध्या उघडता येणे शक्‍य नाही किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्या सुरू केल्या जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. या वेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांच्यासमवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

त्याच वेळी इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन उघडण्याची घाईगडबड केली गेली आहे; परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट सुरू करायची असेल, तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कोव्हिड केंद्राचे लोकार्पण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने तयार केलेल्या कळवा आणि मुंब्य्रात ११०० बेडच्या कोव्हिड केंद्राचे या वेळी ई-लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आता रुग्णांना बेड मिळणार नाही, अशी तक्रारदेखील येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण या वेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख