मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर राडा; विचारे, दिघे अन् शिंदेंचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज!

EKnath Shinde : दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिस्थिती तणावाखाली होती.
Thackeray Shinde Clash
Thackeray Shinde ClashSarkarnama

ठाणे : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा तूफान राडा झाला आहे. वागळे इस्टेट या भागात किसननगर येथे ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद विवाद झाला होता. या वादाचे रूपांतर राड्यामध्ये झाले. दोन्ही गटांकडून श्रीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिस्थिती तणावाखाली होती. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला.

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा तूफान राडा झाला आहे. वागळे इस्टेट या भागात किसननगर येथे ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद विवाद झाला होता. या वादाचे रूपांतर राड्यामध्ये झाले. दोन्ही गटांकडून श्रीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आले. राडा घडून आला त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेने ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील तेथे हजर होते. दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिस्थिती तणावाखाली होती. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला.

Thackeray Shinde Clash
Rohit Pawar : रोहित पवारांच्या राऊतांना हटके शुभेच्छा : '९ वाजताच अनेकांचे १२ वाजवणारे...'

दोन्ही गटात वाद निर्माण झाल्याने यावेळी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते यावेळी जखमी झाले. विचारे आणि दिघे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यावेळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.

Thackeray Shinde Clash
Devendra Fadnavis रात्रीस खेळ चाले : शिंदे-फडणवीसांची मध्यरात्री गुप्त बैठक!

राजन विचारे यांनी हद्दीतील श्रीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी हजेरी लावली. शिंदे गटाचे नेते व ठाणे शहरप्रमुख नरेश म्हस्के हे देखील पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवेलो. तक्रारीनुसार दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिस ठाण्याबाहेरही दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले, यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com