खासदार शिंदेंनी बालेकिल्ल्यातील शाखा ताब्यात घेतली; ठाकरे गटाचे तोडीस तोड उत्तर

Dombivli News : खासदार श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाची शाखा
Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama

Dombivli News : डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचा शिंदे गटाने कायदेशीर ताबा घेतला. यानंतर हार न मानता ठाकरे गटाने शाखेपासून हाकेच्या अंतरावरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपली नवीन शाखा सुरु केली आहे. सेनेतील दुफळीनंतर डोंबिवलीत शिंदे गटाचे कार्यकर्ते केवळ आमने-सामने आल्याचे पहायला मिळत असताना आता शाखा देखील आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. गेल्या दोन तीन दशकांपासून मध्यवर्ती शाखेतून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली जात होती. आता याच शाखांचे विभाजन झाल्याने डोंबिवलीकर कोणाकडे दाद मागायला जातात? हे आता येणारा काळच ठरवेल.

कल्याण-डोंबिवली शिवसेनेचा बालेकिल्ला असून कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा आहे. याच मतदार संघात असलेल्या डोंबिवलीच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळविण्यासाठी ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. ठाकरे गटाच्या अवघ्या काही सदस्यांनी शिंदे गटाला अडविल्याने शिंदे गटाचा अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर शिंदे गटाने कायदेशीर लढाई लढून ती शाखा ताब्यात घेतली.

Shrikant Shinde
MNS : वय झालेले राज्यपाल महाराष्ट्राला नको, त्यांना परत दिल्लीला बोलवा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच डोंबिवलीत दौरा झाला होता. यावेळी त्यांनी या शाखेला भेट दिल्यानंतर त्यांचे पुत्र तथा खासदार शिंदे यांना आपले अश्रु अनावर झाले होते. मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळविल्यानंतर ठाकरे गटाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर डोंबिवली स्टेशन परिसरात मध्यवर्ती शाखेपासून हाकेच्या अंतरावरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जुनी ढापरे बिल्डिंगमध्ये आपली नवीन शाखा सुरु केलीय. गेल्या दोन तीन दशकांपासून जुन्या मध्यवर्ती शाखेतून शिवसैनिक आपले कामकाज चालवत होते. आता ठाकरे गटाने आपला संसार नवीन कार्यालयात हलविला आहे.

Shrikant Shinde
मौनात गेलेले कोल्हे अवतरले अन्‌ भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत...’

ठाकरे गटाकडून शनिवारी नवीन शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेतून नव्या जोमाने काम करुन येत्या काळात यश संपादन करु, असा विश्वास यावेळी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, ''निश्चित गेले 30 वर्षे आम्ही मध्यवर्ती शाखा कार्यालयातून काम करत होतो. मात्र ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली, याचे आम्हाला वाईट वाटले. मध्यवर्ती शाखा त्यांनी ताब्यात घेतली तरी आमचे काम काही ते थांबवू शकलेले नाहीत. आजही अनेक शिवसैनिक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत असून जे गेले त्यांच्याबद्दल आता आम्हाला बोलायचे नाही. पुन्हा नव्या जोमाने आम्ही कामाला सुरुवात केली असून येणाऱ्या काळात आम्ही यश नक्कीच मिळवू'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in