राजू शेट्टींचा पाया उखडलाय? : लोकसभेची पुढील लढत खासदार माने विरुद्ध आवाडे...

Raju Shetti |Dhairyasheel Mane | Prakash Awade : महाडिकांच्या विजयाचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरही परिणाम...
Prakash Awade, Raju Shetti, Dhairyasheel Mane
Prakash Awade, Raju Shetti, Dhairyasheel ManeSarkarnama

- दिलीप माणगावे

राज्यसभेच्या अत्यंत गाजलेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते कोल्हापूरचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी विजय मिळवला. या विजयानंतर राज्य भाजपचा (BJP) आत्मविश्वास चांगलाच दुणावल्याचे दिसत आहे. या विजयानंतर कोल्हापूरच्या राजकारणात आणि त्यातही आगामी महापालिकेपासून लोकसभा निवडणुकांच्या राजकारणात बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूरसह शेजारच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरही याचा परिणाम होणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे. हाच परिणाम नेमका काय आणि कसा होणार याबाबत जेष्ठ्य पत्रकार दिलीप माणगावे यांनी सविस्तर लिहिले आहे.

माणगावे लिहितात,

काल कोल्हापूर जिल्ह्यात एक नवे राजकीय समीकरण तयार झाले. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी काल इचलकरंजीत एका समारंभात कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवण्याचे जाहीर केले. यात आमदार विनय कोरे यांचाही सहभाग असणार आहे. या तिघा नेत्यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर पकड आहे. (Hatkangale Loksabha Constituency latest News)

Prakash Awade, Raju Shetti, Dhairyasheel Mane
महादेव जानकारांनी बटाटे वडे तळले अन्‌ राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंनी हेडलाईन सांगितली...

तिघे ही साखर कारखानदार आहेत. या तिघांना पक्षात घेऊन भाजपाने कॉंग्रेस पक्ष खिळखिळा केला आहे. शिवाय सहकारात. सोबतच यातून शरद पवार यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील वर्चस्वाला कमकुवत केले आहे. कारण हे तिघेही पूर्वाश्रमीच्या शरद पवार गटातील म्हणून ओळखले जातात. (Hatkangale Loksabha | Dhairysheel Mane| Constituency latest News)

२०२४ ची आखणी

येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे निवडणूक लढवतील. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले लोकसभेची जागा जिंकायची आहे. सध्या भाजपकडून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव चर्चेत आहे. (Hatkangale Loksabha Constituency latest News)

मोदी यांच्या कॉंग्रेस मुक्त भारत धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल झाल्यास या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी अशी छुपी युती होवू शकते. अशी छुपी युती करूनच राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने एकत्र येत राजू शेट्टी यांना घरी बसवले. शेट्टी यांना सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे. पण जिल्ह्यातील कॉंग्रेस शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालते. त्यामुळे त्यांच्यातील बरेच कार्यकर्ते या छुप्या युतीत सामिल होतात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील साखर कारखानदारांच्या मदतीने शेट्टी यांनी शरद जोशी यांची शेतकरी संघटना संपवली. आता त्यांनी शेट्टींना संपवले. (Dhairysheel Mane latest News)

Prakash Awade, Raju Shetti, Dhairyasheel Mane
खडसेंच्या पराभवासाठी भाजपला हवीत फक्त तीन मते : महाजन लागलेत कामाला...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देशात जैन धर्मीयांची लोकसंख्या लक्षणीय आहे. या मतावर राजू शेट्टी उड्या मारायचे. पण राष्ट्रवादी कडून आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील या दोघा जैन धर्मीय नेत्यांना बळ देवून शेट्टी यांचा धार्मिक पाया उखडला आहे. परवा सांगलीत जैन समाजातील दक्षिण भारत जैन सभा या धार्मिक संघटनेचे शताब्दी अधिवेशन झाले. अजित पवार या अधिवेशनात जातीने उपस्थित होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर होते. या अधिवेशनात जैन धर्मातील ऊच्च नेतृत्वाने शेट्टी यांना अडगळीत टाकले. (Hatkangale Loksabha Constituency latest News)

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांनी अधिवेशनातील जैन धर्मीयांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. दुसरीकडे जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाणा आवाडे यांनी आपल्या साखर कारखान्याचे नामांतर घडवत स्वत:चे नाव लावून घेतले आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कॉंग्रेसला आवाडे कुटुंबियांनी सोडचिठ्ठी देवून मोठे धाडस केले आहे. या नामांतर सोहळ्याचा मोठा समारंभ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

याच समारंभात आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजपाचे प्रकाश आवाडे विरूद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील माने. या मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले राजू शेट्टी आता चित्रात सुध्दा दिसत नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महामानव शरद जोशी यांच्या पाठीत खंजीर खुपसून ऊस उत्पादकांचा विश्वासघात करणारे शेट्टी पेन्शनीत निघाले आहेत. जनतेने हाती नारळ दिला. नियतीने खांद्यावर शाल पांघरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in