Bhim Jayanti : बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कोणी? कुठे? आणि कसा साजरा केला?; वाचा महत्त्वपूर्ण माहिती !

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : कोणी सुरू केली ही प्रथा?
Bhim Jayanti : Dr. Babasaheb Ambedkar Jayanti :
Bhim Jayanti : Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : Sarkarnama

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून, हाती निळे झेंड घेत आणि जय भिमचा एकच जयघोष करताना लोकं दिसली, म्हणजे भिमजयंतीचा महोत्सव सुरू आहे, एवढं स्पष्ट होतं. केवळ देशभरातच नाही, तर अवघ्या विश्वभरातच भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते.

शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत म्हणजे भिम जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणाऱ्या या भिम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला? कुठे सुरू झाला ? मुख्य म्हणजे कोणा सुरू केला? असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधी ना कधी पडलेला असेल. याच गोष्टीचा 'सरकारनामा'ने आपल्या वाचकांसाठी घेतलेला हा आढावा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला? असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला वाटत असेल की, नक्कीच मुंबई, नागपूर, महू, इत्यादी शहरांचा विचार आपल्या मनात आलाच असेल. मात्र तसे अजिबात नाही. चळवळींची आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखली जाणाऱ्या पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

डॉ. आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे (Pune News) शहरात १४ एप्रिल १९२८ रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीम जन्मोत्सवाचे समारंभाचे ते शिल्पकारच ठरले. ही प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना, जयंतीच्या औचित्य साधत, त्यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा चक्कं हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

Bhim Jayanti : Dr. Babasaheb Ambedkar Jayanti :
Rahul Gandhi Visits Matoshree : राहुल गांधींचे 'मातोश्री' भेटीच्या चर्चेवरून भाजप मंत्र्यांची टीका; म्हणाले, "त्यांच्या गाठीभेटी..."

डॉ. आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात १४ एप्रिल १९२८ रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीम जन्मोत्सवाचे समारंभाचे ते शिल्पकारच ठरले. ही प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकीच्या पत्र विभागातदलित मंडळाचे अध्यक्ष असताना, जयंतीच्या औचित्य साधत, त्यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा चक्कं हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख जनार्दन सदाशिव रणपिसे यांची आहे. रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ या साली झाला. ज्या काळात दलितांनी शिक्षण संपादन करणेच एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले. यातच त्यांचे मोठेपण आहे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन, त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्ययन केले. १९१८ ते १९२१ या तीन वर्षात त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना केली. सामाजिक सभा, संमेलने व्याख्याने, नाटके प्रौढांकरता रात्रीचे शिक्षण वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरूण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

विशेष म्हणजे, महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. या दलाचे कमांडर इन चीफ बनले. राजकारण ते फारसे सक्रिय राहिले नाहीत. पण, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्याकाळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये, तसेच प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती. ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित नव्हती. यात तेव्हाच्या मुंबई प्रांतभरातून प्रतिनिधी आले होते. १९३९ च्या कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून आले, याचे श्रेय अर्थातच रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.

Bhim Jayanti : Dr. Babasaheb Ambedkar Jayanti :
Aam Adami Party: विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणण्यास विरोधी पक्षांचा नकार; काय आहे कारण?

महात्मा गांधी यांनी पुण्यात उपोषण सुरू केले होते. या दरम्यान बाबासाहेब पुणे शहरात येणार होते. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवाच वसाच घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com