#PuneFirst अभिमान पुण्याचा...सन्मान कोरोना योद्ध्यांचा! - Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

#PuneFirst अभिमान पुण्याचा...सन्मान कोरोना योद्ध्यांचा!

गणेश बीडकर, नेता सभागृह, पुणे महानगरपालिका
मंगळवार, 15 जून 2021

कोरोना संपल्यावर न्यू नाॅर्मलला येत असताना जनरितीप्रमाणं हळुहळू कोरोना काळात स्वतःला झोकून दिलेल्या व्यक्ती- संस्था विसरल्या जातील का काय, अशी मनाला भीती वाटायला लागली. नाही. असं होता कामा नये. पहिली लाट आली आणि गेली. दुसरी ओसरतेय. तिसऱ्या लाटेचीही चर्चा होतेय. तिसरी लाट सुदैवानं आलीच नाहीत तर या कोरोन योद्ध्यांना आपण विसरणार का?...

रवाच एका जुन्या कार्यकर्त्याचा फोन आला. गणेशराव...चाललंय तरी काय? त्याच्या पहिल्या प्रश्नानं माझ्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. काय झालं? मी विचारताच....अहो होर्डिंग पाहिलं पार्टीचं त्या चौकात....त्यावर चक्क विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोटो? Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

आता डोक्यात प्रकाश पडला...अरे काही नाही...अभिमान पुण्याचा! हे मी सांगताच फोनवर एक दीर्घ पाॅज आला. ये संध्याकाळी हे नक्की काय आहे हे सांगतो तुला......मी त्याला म्हणालो. संध्याकाळी भेटही झाली आमची. या भेटीत त्यानं जे प्रश्न विचारले, तेच प्रश्न अनेकांच्या मनात असणार हे जाणवलं. म्हणून ठरवलं चला लिहू या या विषयावर...

अभिमान पुण्याचा....
प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या शहराचा गावाचा. कुणाला त्या शहराच्या इतिहासाचा अभिमान वाटतो तर कुणाला तिथल्या थोर व्यक्तींचा. कुणाला एखाद्या खाद्यपदार्थाचाही अभिमान वाटू शकतो. पण यावेळी अभिमान वाटण्याचं कारण वेगळं आहे. 

गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये कोरोनाचं वादळ देशात घुसलं आणि त्या वादळानं सगळंच उलथवून टाकलं. लाॅकडाऊन लावावा लागला. अनेकांनी जवळच्या व्यक्ती गमावल्या. लाॅकडाऊनमध्ये नोकऱ्या गमावल्या. उद्योगधंद्यातून येणारं उत्पन्न गमावलं. हे झालं वर दिसून येणारं नुकसान. कोरोनाच्या संकटाच्या काळात माणून माणसाला घाबरायला लागला. पण या संकटातही काही भक्कमपणे उभे राहिले. या व्यक्ती, या संस्था याच पुण्याच्या अभिमानाचा विषय ठरल्या. Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

कोरोना संपल्यावर न्यू नाॅर्मलला येत असताना जनरितीप्रमाणं हळुहळू कोरोना काळात स्वतःला झोकून दिलेल्या व्यक्ती- संस्था विसरल्या जातील का काय, अशी मनाला भीती वाटायला लागली. नाही. असं होता कामा नये. पहिली लाट आली आणि गेली. दुसरी ओसरतेय. तिसऱ्या लाटेचीही चर्चा होतेय. तिसरी लाट सुदैवानं आलीच नाहीत तर या कोरोन योद्ध्यांना आपण विसरणार का?...

...नाही. भारतीय जनता पक्ष हे होऊ देणार नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध व्यक्तींच्या घराबाहेर निल फलक लावले जात. त्या व्यक्तीची आठवण ठेवण्यासाठी. तसंच काही करावं असं डोक्यात आलं आणि ठरवलं एक मोहिम राबवायची....अभिमान पुण्याचा! पुणे महापालिकेत भाजप सत्तेवर आहे. महापालिकेतला सभागृह नेता म्हणून मी पक्ष नेतृत्त्वाला हा विषय सुचवला आणि एका क्षणात त्यांनी मान्यता दिली. मग सुरु झालं या कोरोना वाॅरिअर्सचा डेटा गोळा करण्याचं काम. ही माहिती गोळा करत असताना सुखद धक्के बसत होते. जात-पात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन हे कोरोना वाॅरिअर्स लढत होते. त्यांच्या दृष्टीनं जात-पात-धर्म-पंथ एकच होता तो म्हणजे माणुसकी! याच माणुसकीनं कोरोनाच्या या संकटातून आपल्याला तारलं. Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहराध्यक्ष अण्णा थोरात. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा. कोरोना काळात त्यांची नवी ओळख झाली ती अखंड रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांना जेवण देणारा कार्यकर्ता म्हणून.  एमआयएमचे अंजुम इनामदार. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाच्या काळात चौदाशेंहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोरोनानं मरण पावलेल्या दुर्दैवी जीवांकडं नातेवाईकही फिरकत नसत. अशा काळात अंजुम इनामदार मसिहा ठरले. 

कट्टर शिवसैनिक असलेले जावेद खान यांनीही कोरोनानं मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी घेतली. हे करताना जात-पात-धर्म हे त्यांच्या आड आले नाही, की आपण कोरोनानं ग्रासू ही भीती त्यांच्या मनाला शिवली नाही. पक्के काँग्रेसी असलेले किरण सावंत. त्यांनी सॅनिटायझेशनचं काम हाती घेतलं. स्वतःची नोकरी गमावल्याचं, भाच्याचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं दुःख बाजूला सारत त्यांनी पोलिस स्टेशन, सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणं यांचे मोफत सॅनिटायझेशन करायला सुरुवात केली. त्या औषधाचा डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना दृष्टीदोष निर्माण झाला. तरीही त्यांचं काम सुरुच राहिलं. 

मराठा चेंबर आॅफ काॅमर्स, 'मिशन वायू' यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा पुणे पॅटर्न अनेक शहरांनी स्वीकारला. राम बांगड यांच्यासारखा रक्तदान चळवळीतला कार्यकर्ता प्लाझ्मा दानासाठी धडपडत होता. स्वरुपवर्धिनीच्या आमच्या भगिनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला पुढे आल्या. अँब्युलन्सचे चालक दिवस-रात्र न थकता कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेऊन पोहोचवत होते. पोलिस रस्त्यावर उभे होते, डाॅक्टरांची सततची लगबग सुरु होती. आरोग्य सेविका-नर्सेस, महापालिकेचे सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्था हे सगळेच या युद्धात उतरले होते. Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

संकट काळात उभं राहणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं व्रतच. या कोरोना काळातही संघानं करुन दाखवलं. ठिकठिकाणी कोविड सेंटर उभी केली. संघाचे स्वयंसेवक घरदार सोडून या कोविड केंद्रावर जाऊन राहिले. येणाऱ्या रुग्णांना धीर दिला. या केंद्रांवर अगदी घरच्यासारखं वातावरण होतं हे अनेकांनी आवर्जून सांगितलं. कोरोना काळात आणि नंतरही रक्ताचा तुटवडा येणार याचा अंदाज घेऊन जनकल्याण रक्तपेढींनी सुरक्षित वातावरणात रक्तदान शिबीरं घेतली आणि शेकडो बाटल्या रक्त गोळा केलं. नंतरही लसीकरण केंद्रांवर काम करायला संघाचे स्वयंसेवक उभे राहिले. 

या सगळ्यांनाच मनापासून सलाम!

आता सुरु असलेल्या 'अभिमान पुण्याचा' या संकल्पनेमागं आहे ती कृतज्ञतेची भावना. महापालिकेतला सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण काम करतोच आहोत. पण त्याही पलिकडे जाऊन गरज आहे ती या सगळ्या कोरोनाशी लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणण्याची. मी आणि माझा पक्ष तेच करतोय. म्हणूनच आहे ही अभिमान पुण्याचा.....मोहिम. Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

होर्डिंग म्हटलं की पुणेकर नाकं मुरडतात. प्रसंगी टिंगल-टवाळीही होते. पण आज पुण्यात जागोजागी जी होर्डिंग दिसतील त्यावर चेहेरे असतील ते कोरोना काळातल्या देवदुतांचे. कुणी म्हणेल पुढं येणारी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन केलेला हा पब्लिसिटि स्टंट आहे. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा येईल. त्यावेळी परिस्थिती सुधारली असेल तर राजकीय होर्डिंग नक्की लावू. ती त्यावेळची गरजही असेल. पण आज गरज वेगळी आहे. राजकीय हेतुनं होर्डिंग लावली कुणी म्हणले, तर त्यावरचं भारतीय जनता पक्षाचं नांव अगदी लहान अक्षरात लिहिलेलं दिसेल. या होर्डिंगवर जे चेहेरे असतील ते फक्त आणि फक्त आजवर समोर न आलेल्या कोरोना योद्ध्यांचे! अर्थात ही होर्डिंग उभारण्यामागं भारतीय जनता पक्ष आहेच. महापालिकेतले सत्ताधारी, पुण्याचे कारभारी म्हणून या सर्वांचं कौतुक करणं आमची जबाबदारी आहे, याच अर्थानं पक्षाचं नांव होर्डिंगवर ठेवण्यात आलं आहे. 

मी स्वतः लहानाचा मोठा झालो तो जुन्या पुण्यात. वाडे संस्कृतीत. एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे शेजारी मी पाहिले. अनुभवले. कोरोना काळात कुठलीही प्रसिद्धी न मिळवता भक्कमपणे उभे राहिलेले हे कोरोना योद्धे पुणेकरांचे सख्खे शेजारीच. कोरोनाच्या दुःखात 'आम्ही आहोत,' ही आश्वासक साद घालणारे. पुण्यात सुमारे २५ ठिकाणी आम्ही होर्डिंग लावून आमच्या परीनं या पुण्याचा अभिमान ठरलेल्यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतो आहोत. छोट्या चित्रफिती, पोस्टर्स, फेसबूक पोस्ट यांच्यामाध्यमातूनही आम्ही या सेवाव्रतींचं काम तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत आणि पोहोचवणार आहोत. Pune BJP Leader Ganesh Bidkar Initiates Pride of Pune Movement

पुण्याच्या रस्त्यावरुन जाताना तुम्हाला हे होर्डिंग दिसतील. तिथं आवर्जून थांबा. या योद्ध्यांना सलाम करा. जाहीरपणे केला नाहीत तरी मनोमन त्यांचे आभार माना. कारण पुण्यानं कोरोनाशी दिलेल्या लढ्यातले ते सैनिक आहेत.  

हा एक पथदर्शी प्रयत्न आहे. कोरोना संपल्यानंतरही आणि तो संपणारच...आपण सर्व पुणेकर एकत्र आहोत हे सर्वांना दिसलं पाहिजे. #PuneFirst ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे एवढीच माझी या सगळ्यामागची प्रामाणिक भावना आहे.

पहा आम्हाला अभिमान वाटावा असे पुणेकर

फोटो गॅलरीमध्ये........

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


फोटो फीचर