Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News

ब्लॉग

गणेश पांडे 
परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यातील जागावाटपाबाबत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीत फारशी क्‍लिष्टता नाही. परंतु शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीत मात्र काही जागांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युतीतील इच्छुक आतापासूनच दावे प्रतिदावे करू लागले आहेत. निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडीचादेखील प्रभाव राहणार असून, जर त्यांना तगडा उमेदवार मिळाला तर एखादी जागादेखील त्यांच्या पदरात पडू शकते, अशी... आणखी वाचा
महेंद्र दुसार 
जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यात लोकसभेच्या रायगड मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण, तर मावळ मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभेच्या मावळ आणि रायगड मतदारसंघांत शिवसेनेची मक्तेदारी होती. शिवसेना-भाजपची ही वाढती ताकद रोखण्यासाठी एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांनी आघाडी... आणखी वाचा
अरुण जैन 
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील नरेंद्र मोदी लाट आणि वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाच्या फटक्‍यातून अजूनही कॉंग्रेस सावरलेली नाही. याची पुनरावृत्ती विधानसभेत झाल्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे पानिपत व्हायला वेळ लागणार नाही, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नसल्याची राजकीय परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे 'वंचित'मुळे बसणारा फटका कसा दूर करायचा, हाच आघाडीसमोर चिंतेचा विषय आहे; तर... आणखी वाचा
दीपा कदम 
बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) यांनी हातात हात घालून लोकसभेची निवडणूक लढवली होती; मात्र राष्ट्रीय पातळीवर फारसे रंग भरले गेले नसल्याने ही आघाडी दुभंगली आहे. बहुजन समाजाची मते दलित उमेदवारांना मिळत नसल्याची टीका करत बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी 'सप'ला रामराम केला. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या... आणखी वाचा