99 % कॉंग्रेस आमदारांना वाटते भाजप सत्तेत नको : वडेट्टीवार 

99 % कॉंग्रेस आमदारांना वाटते भाजप सत्तेत नको : वडेट्टीवार 

मुंबई : राज्यात भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्याचे कॉंग्रेसच्या 99% आमदारांचे मत असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. 

विधानसभा निकालानंतर आज तेरा दिवस उलटल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले नाही. सत्तास्थापनेचा गुंता वाढतच चालला आहे. शिवसेना भाजपसोबत जाणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. की दोन्ही कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्तेत येणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सर्व घडामोडीवर आमदारांची मते जाणून घेण्यासाठी आज कॉंग्रेसने बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांना काय वाटते याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. 

ते म्हणाले, ""आम्ही आमदारांच्या भूमिका आज बैठकीत जाणून घेतल्या. दिल्ली हायकामंडला आम्ही आमची स्थानिक भूमिका कळवणार आहोत. शिवसेनेचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा कौल जनतेने दिला आहे.'' 

बाळासाहेब थोरात म्हणाले, की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. गेल्या पाच वर्षात सरकार अपयशी ठरल्याने आम्ही ही भूमिका घेतली आहेजनतेने आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा कौल दिला आहे. शिवसेनेचा आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. हुसेन दलवाई यांनी राऊत यांची घेतलेली भेट ही खासगी होती. शिवसेना आणि आमची विचारधारा वेगळी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com