95 medical stream students will be helped | Sarkarnama

त्या 95 विद्यार्थ्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार परीक्षेच्या परवानगीसाठी एमसीआयला करणार मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मार्च 2017

सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हीताच निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
- जयंत पाटील, शेकाप आमदार

मुंबई, ता. 10 : साताऱ्यातील आयएम्एसआर वैद्यकीय महाविद्यालयातील 95 विद्यार्थ्यांना एमबीबीएस च्या परिक्षेला बसू देण्याची विनंती राज्य सरकारकडून मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडियाला ( एमसीआय) केली जाणार आहे. सभापतींच्या अध्येक्षतेख़ाली विधान भवनात पार पडलेल्या विशेष बैठकित हा निर्णय घेण्यात आला. चुकीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे परिक्षेपासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरीही यावर एमसीआय नेमकी काय भूमिका घेते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सताऱ्यातील ( मायणी) आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयने 2014-15 या शैक्षणिक वर्षात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत आयएमसी ने हरकत घेतली होती. एमएस सीईटी च्या ऐवजी असोसिएट सीईटी परीक्षा घेतल्याने हे प्रवेश आयाएमसी कडून रद्द ठरविण्यात आले. याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊनही दिलासा न मिळाल्याने इथे शिकणाऱ्या एकूण 95 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. परिक्षेपासून वंचित राहवे लागलेल्या या विद्यार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत राज्य सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती.

या विद्यार्थ्यांची समस्या सोडविन्यासाठी चालु अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. त्यानतर सभपतींच्या दालनत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सभागृह नेते चंद्रकांत पाटिल आणि इतर आमदारांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारकडून आयएमसीला विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी न्यायालयाने महाविद्यालयाला ठोठावलेल्या दंडाची 20 कोटींची रक्कमही सरकारने अदा केली आहे. सभपतींच्या आश्वासनामुळे गेल्या 52 दिवसांपासून सुरु असलेले उपोषण या विद्यार्थ्यानी मागे घेतले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख