95 IPS officers transffered | Sarkarnama

राज्यातील 95 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मकरंद रानडे पिंपरी-चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त

सरकारनामा
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. मकरंद रानडे यांची   पिंपरी -चिंचवडच्या आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्तपदी  बदली झाली आहे . पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक्क यांची पोलिस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक येथे वर्णी लागली आहे.

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर शुक्रवारचा मुहूर्त मिळाला. 95 पोलिस उपायुक्त, तर सहा विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

मुंबई : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. मकरंद रानडे यांची   पिंपरी -चिंचवडच्या आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्तपदी  बदली झाली आहे . पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक्क यांची पोलिस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक येथे वर्णी लागली आहे.

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर शुक्रवारचा मुहूर्त मिळाला. 95 पोलिस उपायुक्त, तर सहा विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

वर्धाच्या अधीक्षक निर्मला देवी, ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, पालघरचे अधीक्षक मंजुनाथ सिंगे, सहायक महानिरीक्षक दीपाली मासिरकर, ठाणे एसीबीचे अधीक्षक संग्रामसिंग निशानदार, अमरावतीचे अधीक्षक अभिनाश कुमार, चंद्रपूरच्या अधीक्षक नियती ठाकेर, बुलडाणाचे शशिकुमार मीना, पुण्याचे उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबईत बदली करण्यात आली. 

अशोक दुधे यांची नवी मुंबई, दीपक देवराज यांची ठाणे, अविनाश अंबुरे यांची ठाणे, एस. एस. बुरसे यांची ठाणे, मुंबई पोलिस परिमंडळ तीनचे उपायुक्त वीरेंद्र मिश्रांची उपआयुक्त गुप्तवार्ता विभाग, सोलापूरचे उपआयुक्त नामदेव चव्हाण यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथे बदली करण्यात आली.

 संदीप कर्णिक यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली, तर सोलापूरचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना अपर पोलिस आयुक्त, मुंबई (वाहतूक) पदावर बढती देण्यात आली. 

पालघरच्या पोलिस अधीक्षकपदी गौरव सिंग यांची, तर चंदपूरच्या पोलिस अधीक्षक नियती ठाकेर यांची मुंबईत बदली झाली आहे.

केशव पाटील यांची अपर पोलिस आयुक्त (ठाणे शहर) पदावर बदली झाली आहे . 

डी. वाय. मंडलिक यांची पोलिस उपमहानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पदावर बदली झाली आहे . 

रवींद्र शिसवे यांची अपर पोलिस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई)  पदावर बदली झाली आहे . 

 एस. जयकुमार यांची  अपर पोलिस आयुक्त सशस्त्र दल, मुंबई   पदावर बदली झाली आहे . 

 संदीप कर्णिक यांची  मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. 

सोलापूरचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची अपर पोलिस आयुक्त (वाहतूक)पदी वर्णी लागली आहे.  गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक विभागात हे पद रिक्त होते. 

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-1 चे उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांना बढती देण्यात आली. त्यांची अपर पोलिस आयुक्त (पश्‍चिम प्रादेशिक विभाग, मुंबई)पदी निवड करण्यात आली. 

 नवी मुंबई पोलिस उपायुक्त प्रवीण पवार यांची अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली. 

राज्यपालांचे परिसहायक गौरव सिंग यांची पोलिस अधीक्षक पालघर पदावर बदली झाली आहे . 

डॉ. एस. टी. राठोड यांची अधीक्षक ठाणे ग्रामीण  पदावर बदली झाली आहे . 

 मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांची पोलिस अधीक्षक नांदेड  पदावर बदली झाली आहे . 

तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त निसार तांबोळी यांची पोलिस अधीक्षक वर्धा या ठिकाणी बदली झाली.

 मध्य रेल्वेचे उपायुक्त समाधान पवार यांची अपर अधीक्षक जालना पदावर बदली झाली आहे . 

अकोल्याचे  अपर अधीक्षक विजयकांत सागर यांची अपर अधीक्षक वसई  पदावर बदली झाली आहे .  

 विनायक देशमुख यांची सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पोलिस महासंचालक कार्यालय येथे बदली करण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख