पाच जण कोरोनाबाधित झाल्यानंतर जामखेडमध्ये साडेआठ हजार नागरिक होम कोरोंटाईन

"जामखेड शहरामध्ये पाच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहराकडे येणारे सर्व रस्ते 'सील' केले आहेत.त्यामुळे बाहेरून येणारी सर्व वहाने पूर्णपणे थांबवले आहेत. सर्व परिसर 'सील' केला आहे, शहरासह तालुक्यातील सर्व धार्मिकस्थळ सील केली आहेत, "अशी माहिती तहसीलदार सुशील नाईकवाडे यांनी दिली.
8500 persons quarantines in jamkhed
8500 persons quarantines in jamkhed

जामखेड :  " जामखेड शहरात पाच कोरोना बाधित व्यक्ती आढळल्याने तालुक्यातील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने खबरदारीच्या प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तालुक्यामध्ये मुंबई-पुणे व अन्य भागातून आलेल्या साडेआठ हजार नागरिकांना 'होम कोरोंटाईन' केले आहे. तसेच तालुक्याच्या व गावांच्या हद्दी सील केल्या आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्ती जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांनी दिली.

जामखेड तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनस्तरावरून जिल्हाधिकारी व मुख्य अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या सूचनांच्या आधारे  तालुक्यांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना प्रतिबंधात्मक उपाययोजना तालुक्यांमध्ये राबवल्या जात आहेत. तालुक्यातील सर्व गावांमध्ये संचारबंदी लागू केली असून, बाहेरील येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध केला जातो आहे. गावाच्या हद्दी सील' केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची समिती गठित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, अशा वर्कर तसेच पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांना मुख्यालयात राहणे अनिवार्य केले असल्याचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे यांनी सांगितले.

पदाधिकारी लागले कामाला
ग्रामीण भागातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख बाजारपेठा धार्मिक स्थळे, मंगल कार्यालय बंद करण्यात आलेली आहेत. फक्त आवश्यक सेवा यातून वगळण्यात आले आहे. तसेच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्जंतुकीकरणासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले सोडियम क्लोराइड हे सोल्युशनची सर्व गावांमध्ये फवारणी करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्याचे फवारणीचे काम सुरू आहे. तालुक्याचे प्रमुख तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तालुक्‍यात सर्व पदाधिकारी सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य ,सरपंच यांच्याशी संपर्क साधून आहेत. अशा पद्धतीने जामखेड तालुक्यामध्ये खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत.

"जामखेड शहरामध्ये  पाच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहराकडे येणारे सर्व रस्ते 'सील' केले आहेत.त्यामुळे बाहेरून येणारी सर्व वहाने पूर्णपणे थांबवले आहेत.  सर्व परिसर 'सील' केला आहे, शहरासह तालुक्यातील सर्व धार्मिकस्थळ सील केली आहेत, "अशी माहिती तहसीलदार  सुशील नाईकवाडे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com