7500 youth activists are booked in attempt to murder cases : Raj Thakre | Sarkarnama

राज्यात ७५०० आंदोलकांवर खुनाचा  प्रयत्नाचा केल्याचे गुन्हे  दाखल  : राज ठाकरे 

सरकारनामा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावर यावे लागते . पण मनगटेआपली  असावी लागतात दुसऱ्यांची नको . महाराष्ट्र बदनाम होऊ नये याची काळजी घ्या .

नवी मुंबई : " आज महाराष्ट्रात आरक्षणासाठी तरुण मुले रस्त्यावर येताहेत . मराठा आरक्षणाच्या आंदोलनात  राज्यात ७५०० आंदोलकांवर खुनाचा  प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . त्यांचे  आयुष्य उध्वस्त होणार आहेत , " अशी टीका महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत महानगपालिका कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केली . 

राज ठाकरे म्हणाले , " आता आरक्षण दिले तरी या ७५०० जणांना नोकरी मिळणार  नाही . मुले भाबडी आहेत. त्यांना राजकारण काळात नाही . त्यांना नोकरीची आशा आहे . स्वतःच्या पायावर उभे राहून आई वडिलांना चार पैसे कमावून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे .आंदोलने करणारे वेगळे आणि पेटवणारे वेगळे आहेत . नवी मुंबईत आंदोलना  दरम्यान पोलिसांनी हिंसाचार करताना पकडलेल्या ५६ जणांपैकी अनेक परप्रांतीय आहेत . त्यांचा ना आंदोलनाशी संबंध आहे ना महाराष्ट्राशी . सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावर यावे लागते . पण मनगटे आपली  असावी लागतात दुसऱ्यांची नको . महाराष्ट्र बदनाम होऊ नये याची काळजी घ्या . "

  आंदोलने नोकऱयांसाठी आहेत पण नोकऱ्या  आहेत कोठे ? असा सवाल करून राज ठाकरे पुढे म्हणाले," आज देशात २४ लाख सरकारी जागा रिक्त आहेत . सरकारकडे या जागा भरायला पैसा नाही . नोटबंदीनंतर साडेतीन कोटी लोकांचा नोकरी -रोजगार गेला आहे. पण ही माहिती दाबली जाते . नरेंद्र मोदी या प्रश्नाकडे लक्ष्य देण्याऐवेजी योगा करतात . योगा झाला की बॅग भरतात आणि विमानतळ गाठतात ."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख