कोल्हापुरात 72 हजार जणांच्या हातावर होम क्वॉरंटईनचा शिक्का!

सुरूवातील या परगावाहून आलेल्या लोकांकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. पण त्यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर कोरोनाबाधित शहरातून जिल्ह्यात आलेल्या सर्वांची त्या त्या तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा केंद्रात तपासणी करून त्यांच्या हातावर "होम क्वारंनटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे.
corona pune
corona pune

कोल्हापूर ः मुंबई, पुण्यासह देशभरातील कोरोनाबाधित शहरातून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या तब्बल 72 हजार 702 जणांच्या हातावर होम क्वारंनटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. प्रशासनाने ही माहिती दिली असून यात सर्वाधिक 9 हजार 293 जण शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. यापैकी बहुंताशी लोक हे पुणे, मुंबईसह राज्याच्या इतर जिल्ह्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होते.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या पार्श्‍वभुमीवर 22 मार्च रोजी संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जनता कर्फ्यू' जाहीर केला. पण त्यानंतरही कोरोना संशयितांच्या देशांतर्गत आणि राज्यातील संख्येत वाढच होत चालल्याने श्री. मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. परिणामी मुंबई, पुण्यासह राज्यातील आणि देशातील इतर राज्यातील उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा शहरात काम करणारे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी आपल्या गावची वाट धरली असून गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात अशा शहरांतून तब्बल 72 हजार 602 लोक आले आहेत.


सुरूवातील या परगावाहून आलेल्या लोकांकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. पण त्यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर कोरोनाबाधित शहरातून जिल्ह्यात आलेल्या सर्वांची त्या त्या तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा केंद्रात तपासणी करून त्यांच्या हातावर "होम क्वारंनटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. यातील काही प्रवाशांना 14 दिवस पूर्ण झाले आहेत तर काहींचे दिवस पूर्ण झालेले नाहीत. अशा लोकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी "होम क्वारंनटाईन' चा हातावर शिक्का असलेले लोक बाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुकानिहाय "होम क्वारंनटाईन' असलेल्यांची संख्या
आजरा - 7,234, भुदरगड - 7368, चंदगड-7403, गडहिंग्लज-8207, गगनबावडा-678, हातकणंगले-5388, कागल - 6608, करवीर - 6317, पन्हाळा- 3426, राधानगरी - 5740, शाहुवाडी - 9283, शिरोळ- 4950

संस्थात्मक विलगीकरण केलेले रूग्ण
एकूण आरक्षित बेड - 753
आयसीयु बेड - 14
स्क्रिनिंग केलेले नागरीक- 117
दाखल प्रवासी - 47
नमुना घेतलेले प्रवासी - 34
......................

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com