11 नगर परिषदांपैकी 7 जागी भाजपचे नगराध्यक्ष

11 नगर परिषदांपैकी 7 जागी भाजपचे नगराध्यक्ष

नागपूर : चौथ्या टप्प्यातील नगर परिषद निवडणुकीत विदर्भातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील एकूण 11 ठिकाणी झालेल्या निवडणुकांत भाजपने बाजी मारली आहे. एकूण सात जागी भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांपैकी पाच जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेरचे आमदार सुनील केदार यांना धक्का बसला आहे. पालकमंत्र्यांनी कामठीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. याकरिता माजी मंत्री ऍड. सुलेख कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचासोबत आघाडी केली होती. त्यानंतरही पालकमंत्र्यांना अपेक्षित विजय मिळविता आला नाही.

नगराध्यक्ष
भाजप 6
कॉंग्रेस 1
राष्ट्रवादी 0
विदर्भ माझा 1
नगरविकास आघाडी -1
 

नगरापालिका....... नगराध्यक्ष व पक्ष
1. सावनेर............ रेखा मोवाडे, भाजप
2. उमरेड.............. विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप
3. खापा...............प्रियांका मोहिते, भाजप
4. कळमेश्‍वर...........स्मृती इखार, भाजप
5. रामटेक............. दिलीप देशमुख, भाजप
6. कामठी............. मोहंमद शहाजहा अन्सारी, कॉंग्रेस
7. मोहपा..............शोभा कऊटकर, कॉंग्रेस
8. काटोल.............वैशाली ठाकूर, विदर्भ माझा विदर्भ माझा
9. नरखेड.............अभिजित गुप्ता, नगरविकास आघाडी
10. गोंदिया.............अशोक इंगळे, भाजप
11. तिरोडा............. सोनाली देशपांडे, भाजप

पक्षीय बलाबल
नगरसेवक
भाजप- 103
कॉंग्रेस- 58
राष्ट्रवादी - 26
शिवसेना - 14
शेकाप- 4
विदर्भ माझा- 18
इतर- 20
एकूण जागा - 243
(नागपूर आणि गोंदिया जिल्हा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com