पिंपरी-चिंचवडमध्ये 613 "होम क्वॉरंटाईन तर; 12 जण पाॅझिटिव्ह #fightagainscorona

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांत कोरोना रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे जास्त काळजी घेण्यात येत आहे.
corona pcmc
corona pcmc

पिंपरी : परदेशातून प्रवास करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 613 जणांना "होम क्वॉरंटाईन'मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच आजपर्यंत 105 जणांच्या घशातील द्रावाचे नुमने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 12 जण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर, महापालिकेच्या सर्वेक्षण टीमने बाधित रुग्ण असलेल्या परिसरातील 74 हजार 998 घरांमधील दोन लाख 49 हजार 218 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. शहरातील चर्च बंद आहेत

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 105 व्यक्तींचे कोरोनाकरीता घशातील द्रव्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण 12 असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तिघांपैकी दोघाचे अहवाल निगेटीव्ह आले असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या 244 कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. आजअखेर शहरातील 74 हजार 998 घरांमधील दोन लाख 49 हजार 218 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 613 जण `होम क्वॉरंटाईन`ध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या 100 टीम कार्यन्वित आहेत. अकरा देशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

महापालिकेचा हेल्पलाईन क्रमांक 8888006666 हा आहे. तसेच 9922501450 हा व्हॉट्‌सऍप क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com