आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पन्नास टक्‍के उपस्थितीची अट

विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरीही बंधनकारक केली जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षात त्यासाठीची प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे नवीन आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत.
आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पन्नास टक्‍के उपस्थितीची अट

मुंबई: राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शुल्कपूर्तीसाठी या दोन्ही योजनांच्या लाभासाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये 50 टक्‍के उपस्थिती लावावी लागणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरीही बंधनकारक केली जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षात त्यासाठीची प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे नवीन आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत.


तंत्र शिक्षणाच्या खासगी अनुदनित, विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि त्यासोबत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते.तसेच या योजनेनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, तसेच मत्स्य विभागातील विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम राज्य शासन देते.

आता 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून ही रक्कम संबंधित शैक्षणिक संस्थांऐवजी शिष्यवृत्तीची रक्‍कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात ती आधार कार्डशी संलग्न करून जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची 50 टक्‍के उपस्थितीची अट अनिवार्य करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रीक हजेरीसाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये उपस्थिती प्रणाली कार्यरत करण्यात येणार आहे.

इतर योजनांचीही रक्‍कम बॅंक खात्यात
निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित आभियांत्रिेकी महाविदयालये, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांपैकी ज्या विदयार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विदयार्थ्यांकरिता डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित अभियांत्रिेकी महाविदयालये आणि तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेणाऱ्या विदयार्थ्यांपैकी ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा विदयार्थ्यांनाही डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या लाभाची रक्कमही बॅंक खात्यात जमा होणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com