महाविद्यालयात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्मट, विद्रोही ठरवलं जातंय ! , प्रज्ञा दया पवार यांचा आरोप 

 महाविद्यालयात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्मट, विद्रोही ठरवलं जातंय !  , प्रज्ञा दया पवार यांचा आरोप 

वसई : वर्णश्रेष्ठत्वाला उचलून धरणारी शिक्षणव्यवस्था हिटलनरने विसाव्या शतकात राबवली होती, आज तोच आदर्श झाल्याचे दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयातून प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्मट, विद्रोही ठरवलं जात आहे असा आरोप कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी केला आहे 

विरार येथील विवा महाविद्यालयाच्या सभागृहात नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कवयित्री प्रा. प्रज्ञा दया पवार, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, जेष्ठ साहित्यिका सिसिलिया कार्व्हालो आदी उपस्थित होते. 

प्रज्ञा पवार पुढे म्हणाल्या की, राष्ट्रद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी तयार केला. हा कायदा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, ऑनी बेझंट यांच्याविरोधात वापरला गेला. एकदा का धर्माचा अधर्मावरील ही उक्ती शासकीय दस्ताऐवजामध्ये आणि तीही शिक्षणविषयक नीतितत्त्वामध्ये जात असेल तर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या धर्मद्रोही म्हणून हत्या घडवून आणणाऱ्या सनातन प्रभातचेच राज्य देशभरात आले असे मानायला हरकत नाही. 

ट्युशन मुक्त भारत करा 
विद्यार्थ्याला माणूस व्हायला शिकवा, आज सर्व क्षेत्रात बाजारीकरण झाले आहे. अधिक पैसा कसा मिळेल याकडे कल आहे. शेवटचा विद्यार्थी देखील पुढे कसा जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिक्षणाच्या पदराखाली शिक्षण घेतले जायचे. आज बालकं, पालक, शासन युती झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरण थांबवून ट्युशन मुक्त भारत झाला पाहिजे असे यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी विचार मांडले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com