खोतकरांची केवळ जालन्याच्या नाही तर राज्याच्या राजकारणातही गरज - महादेव जानकर

खोतकरांची केवळ जालन्याच्या नाही तर राज्याच्या राजकारणातही गरज - महादेव जानकर

जालना : अर्जुन खोतकर यांचा प्रशासकीय कामांचा अनुभव मोठा आहे, कधी काळी दुर्लक्षित असलेले आमचे पशुसंवर्धन खाते, खोतकरांमुळे प्रकाशझोतात आले आणि अनेक विकासकामे झाली. खोतकरांची गरज केवळ जालना जिल्ह्याच्या राजकारणातच नाही, तर राज्याच्या राजकारणात देखील आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे केले. 

महायुतीचे जालना मतदार संघातील उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी रासप, शिवसेना, भाजप, रिपाईच्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जानकर म्हणाले, खोतकर यांचे राजकीय महत्व तुम्ही ओळखले पाहिजे, त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव दांडगा आहे, त्याला लाभ मतदारसंघाला निश्‍चितच झाल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या आमच्या खात्याअंतर्गत अनेक मोठी विकासकामे खोतकर यांच्या प्रयत्नांमुळेच झाली. 

जालनेकरांनी हे नेतृत्व जपले पाहिजे हे सांगणासाठीच मी येथे आलो आहे. मी स्वत: खोतकरांचा समर्थक म्हणून उध्दव आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरुन त्यांना मोठी जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच धनगर समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्‍वास देखील जानकरांनी यावेळी व्यक्त केला. ओबीसींचे नुकसान होऊ न देता मराठा समाजाला जसे आरक्षण दिले, तसेच आरक्षण आदिवासी समाजाचे नुकसान न होता धनगर समाजाला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
जानकरांचा मोठा वाटा - खोतकर 
महायुतीची सत्ता येण्यात जानकर यांचा मोठा वाटा राहणार असल्याचे स्पष्ट करून खोतकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जानकर यांनी दोन पावले मागे घेतली असली तरी ती केवळ समाजासाठी घेतली आहेत. समाजासाठी अपमान गिळणारा हा नेता असून उद्याचा काळ त्यांचाच असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com