महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 423; चार बाधितांचा मृत्यू

गुरुवारी राज्यात कोरोनाच्या 88 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 54 जण मुंबईतील, 11 जण पुण्यातील आणि 9 जण नगरचे आहेत. त्याशिवाय 9 रुग्ण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. औरंगाबादमध्ये दोन, तर सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 423 वर गेली आहे.
423 covid-19 patients in maharashtra
423 covid-19 patients in maharashtra

मुंबई : गुरुवारी राज्यात कोरोनाच्या 88 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 54 जण मुंबईतील, 11 जण पुण्यातील आणि 9 जण नगरचे आहेत. त्याशिवाय 9 रुग्ण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. औरंगाबादमध्ये दोन, तर सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 423 वर गेली आहे.

गुरुवारी राज्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नायर रुग्णालयात 31 मार्चला दाखल झालेल्या 61 वर्षांच्या पुरुष रुग्णाला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. मूत्रपिंडाचा जुनाट आजार असलेला 58 वर्षीय पुरुष रुग्ण 29 तारखेला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल झाला होता. उच्च रक्तदाबाचाही त्रास असलेल्या या रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 58 वर्षांच्या आणखी एका पुरुष रुग्णाला 26 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. कस्तुरबा रुग्णालयातील 63 वर्षीय पुरुषाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोविड-19 च्या बळींची संख्या 20 झाली आहे.

विलगीकरणात 40 हजार जण 
राज्यात गुरुवारी एकूण 648 जण वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. एकूण 10 हजार 873 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 423 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 10 हजार 280 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत 42 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38 हजार 244 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 2138 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

"तबलिगी' प्रकरणातील 890 व्यक्तींशी संपर्क
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्चच्या सुरुवातीला झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या राज्यातील नागरिकांचा सर्व जिल्हे आणि महापालिका स्तरांवर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 1062 व्यक्तींच्या यादीतील 890 जणांशी संपर्क झाला असून, त्यापैकी 576 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

राज्यात 2332 पथके
रुग्णांचा समूह सापडलेल्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार "क्‍लस्टर कंटेंटमेंट' कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महापापालिका क्षेत्रात 292 पथके आणि पुणे महापालिका क्षेत्रात 373 पथके कार्यरत आहेत. नागपूर महापालिकेत 210 पथके सर्वेक्षण करत आहेत. राज्यात अशी 2332 पथके काम करत आहेत. नवीन कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील 30 रुग्णालयांना कोव्हिड-19 उपचारांबाबत आदेश देण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com