सांगलीत अद्याप 40 हजार जण पुरात अडकलेले

सांगलीत अद्याप 40 हजार जण पुरात अडकलेले

सांगली ः प्रलंयकारी महापूरानं अनेकांची घरं पाण्याखाली गेली. रौद्र रूप पाहून काहीनी घरं सोडली पण, अजूनही चाळीस हजारवर लोक पूरात अडकले. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहचवण्यासाठी एनडीआरएफसह एसडीआरएफ, सैन्यदल सज्ज आहे. त्यांना थरारक अशा प्रयत्नांना यश मिळत असल्याने पूरग्रस्तांना चांगलाच दिलासा मिळतो आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्याच्या कार्यात वेग वाढला आहे. 

कृष्णा नदीच्या पातळीत गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ झाली. 56.5 फुटापर्यंत पाणी पोहचल्यानंतर सर्वत्र हाहाकार उडाली. मुख्य गावठाणातील गावभाग, मारूती चौक, कोल्हापूर रस्ता, हरिपूर, सांगलीवाडीसह शामरावनगर भागात पाणीच पाणी झाले आहे. त्यात अनेकांची घरं पाण्याखाली गेली. गेल्या चार दिवसांपासून मदतकार्यच्या प्रतिक्षेत होते. सोमवारपासून बोटींची संख्या कमी असल्याने तितक्‍या वेगाने मदतकार्य पोहोचत नव्हते. त्यानंतर सैन्य दल आणि एनडीआरएफच्या आणखी तुकड्या सांगलीत दाखल झाल्या. कमी बोटींद्वारे ही स्थिती नियंत्रणात येणार नाही, हे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आणखी बोटींसाठी प्रयत्न केले. 

त्यानुसार कालच सांगलीत आणखी बोटी दाखल झाला. एनडीआरएफची आणखी पथके दाखल झाली. आजची पहाट झाल्यानंतर तातडीने मदतकार्यास सुरूवात केली. बघता बघता गावभाग, मारूती चौक, सांगलीवाडी, हरिपूरसह शामरावनगर परिसरात बोटी घुसू लागल्या. तातडीने लोकांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेण्यात सुरूवात झाली. गेल्या चार तासात सुमारे हजार एक लोकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकास यश मिळाले. सायंकाळी उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. 

76 बोटी सांगलीत दाखल 
एनडीआरएफ पथकातील 42, पुणे-चिंचवड महानगरपालिकेच्या 2, सोलापूरमधून 12, कोस्टल गार्डकडील 1, महाबळेश्‍वरकडील 6, राजारामबापू सहकारी साखर कारखाना (वाळवा) 1, ग्रामपंचायतीच्या 2, आर्मिच्या 6 अशा 76 बोटी दाखल झाल्या आहेत. ... 

लगेच आरोग्य तपासणी 

पूरग्रस्तांना बोटीद्वारे बाहेर काढल्यानंतर तातडीने त्याच ठिकाणी त्यांनी आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांना अत्यावश्‍यक गोळ्यासह विविध तपासण्याही केल्या जात असल्याने दिलासा मिळतो आहे. तसेच रूग्णांना तातडीने रूग्णलायात दाखल करण्यात येत आहे. 
 
बिनतारी संदेश यंत्रणा... 
एनडीआरएफची टीम आज सांगलीत आली. त्यांनी गाडीतून धडाधड जवान उतरले. त्यांनी बघता बघता बोटी जोडली. अन्‌ पाण्यात गेले. त्यांचे कॅप्टन आणि बोट घेवून जाणारे यांच्या बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संभाषण सुरू होते. पूरग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर तातडीने संदेश पाठवला जात होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com