नागपुरात 4 तर गोंदीयात 1 नवीन  कोरोना रुग्ण आढळला

नागपुरातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेल्याची बातमी ताजी असतानाच शुक्रवारची सकाळ विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आली. नागपूरमध्ये चार तर गोंदियात एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. याचबरोबर विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांचि चिंता वाढली आहे.नागपूर : नागपुरातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेल्याची बातमी ताजी असतानाच शुक्रवारची सकाळ विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आली. नागपूरमध्ये चार तर गोंदियात एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. याचबरोबर विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांचि चिंता वाढली आहे.
4 cororna patient tests posotive in nagpur and 1 in gondiya
4 cororna patient tests posotive in nagpur and 1 in gondiya

नागपूर : नागपुरातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेल्याची बातमी ताजी असतानाच शुक्रवारची सकाळ विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आली. नागपूरमध्ये चार तर गोंदियात एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. याचबरोबर विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांचि चिंता वाढली आहे. 

सद्यस्थितीत नागपुरातील मेयो आणि मेडीकलमध्ये आठ रुग्ण, यवतमाळमध्ये तीन तर गोंदीयात एका कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. रुग्णांची वाढती संख्या विदर्भासह नागपुरकरांना निश्चितच काळजीत टाकणारी आहे. अशा परीस्थितीत नागपुरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी घाबरण्याचे कारण नाही, पण काळजी मात्र पूर्ण घ्यावी लागेल. काहीही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय किंवा नगरपरीषदेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

नागपूरच्या मेडिकल व मेयो रुग्णालयात एकूण चार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एकाला काल सुटी देण्यात आली. उर्वरित तीनपैकी खामला निवासी एक रुग्ण दिल्लीहून परतला होता. त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याची आई़, पत्नी, मुलगा व एका मित्राला देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेने शुक्रवारी दिला. या चौघांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या पाठोपाठ आता गोंदियात देखील एक रुग्ण सापडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com