नगरच्या कोरोना रुग्णांत जामखेडच्या तिघांची भर

कोरोनाचा मोर्चा आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही वळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच "पॉझिटिव्ह' निघालेल्या विदेशी नागरिकांमुळे जामखेड तालुक्‍यातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्‍यात घबराटीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता आठवर पोचली असून, त्यांपैकी पूर्ण बऱ्या झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्ण जिल्ह्यात आहेत. या सर्वांना सध्या "आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आले आहे.
4 corona patient from jamkhed increases count of nagar district to 7
4 corona patient from jamkhed increases count of nagar district to 7

नगर  ः कोरोनाचा मोर्चा आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही वळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच "पॉझिटिव्ह' निघालेल्या विदेशी नागरिकांमुळे जामखेड तालुक्‍यातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्‍यात घबराटीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता आठवर पोचली असून, त्यांपैकी पूर्ण बऱ्या झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्ण जिल्ह्यात आहेत. या सर्वांना सध्या "आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आले आहे.

दोन विदेशी नागरिकांसह 14 जण मॉरिशस येथून दिल्ली येथे आले होते. त्यानंतर हा ग्रुप दोन आठवडे दिल्लीत थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली, असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेट दिली. शनिवारी (ता. 14) रेल्वेने हे सर्व जण नगरला आले. शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसऱ्या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते 26 मार्चपर्यंत होते. मात्र, या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने या 14 जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांतील दोन जणांचे तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही शोध घेऊन जिल्हा रुग्णालयात आणले जात आहे. त्यांतील तीन जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने त्यांनाही "आयसोलेशन'मध्ये पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, मुकुंदनगर व जामखेड परिसर प्रशासनाने "सील' केला आहे. विदेशातून आलेले नागरिक जिल्ह्यातील बहुतांश लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांचाही कसून शोध सुरू आहे. नेवासे, संगमनेर, राहुरी येथील अनेक लोकांना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com