| Sarkarnama

वरुण गांधी म्हणाले, `मुस्लिमांनी मला मतदान केल्यास चांगले वाटेल'

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे - पिलभीत लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार, खासदार वरुण गांधी यांनी मुस्लिमांना मत देण्याचे आवाहन करताना भाषा काळजीपूर्वक वापरण्यास सुरवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी वरुण गांधी यांच्या मातोश्री मनेका गांधी यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने काही तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. त्यामुळे यातून धडा घेत वरुण गांधींनी आता ताकही फुंकून पिण्यास सुरवात केल्याचे दिसते आहे. 

वरुण गांधी यांनी मत देण्याचे आवाहन मुस्लिमांना करताना म्हटले आहे, की मुल्सिम बांधवांना मी एवढेच सांगू इच्छितो, की त्यांनी मला मत दिल्यास चांगले वाटेल. तुम्ही मला मते दिली नाहीत, तरी ठीक आहे. माझ्याकडून कामे करून घ्या. त्यात अवघडल्यासारखे वाटण्याचे काहीच कारण नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख