आजचा वाढदिवस : कॉंग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण - | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : कॉंग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 मार्च 2019

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कुंभारगाव (ता. पाटण) हे आहे. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही कॉंग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळाले आहे. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण कऱ्हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. चव्हाणांनी बिट्‌स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली.

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कुंभारगाव (ता. पाटण) हे आहे. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही कॉंग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळाले आहे. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण कऱ्हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. चव्हाणांनी बिट्‌स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एरॉनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका , फ्रान्स , जपान , जर्मनी , चीन , इटली , नेदरलॅंण्ड , पोर्तुगाल , स्वित्झर्लंडयासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत. महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. कॉंग्रेस पक्षाचे सध्या ते कराड दक्षिणमतदारसंघाचे आमदार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख