| Sarkarnama

सत्तेचा दर्प जनतेनं उतरवला :  शरद पवार यांचा भाजप वर हल्लाबोल 

संजय मिस्किन
बुधवार, 12 डिसेंबर 2018

भाजपच्या मोदी सरकारचा चार वर्षातील एकहाती कारभार व लोकशाही विरोधी धोरणं याला जनतेनं पाच राज्याच्या निवडणूकीत विरोध करत, मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. 

मुंबई : भाजपच्या मोदी सरकारचा चार वर्षातील एकहाती कारभार व लोकशाही विरोधी धोरणं याला जनतेनं पाच राज्याच्या निवडणूकीत विरोध करत, मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. 

गांधी परिवारावर मोदी - शहा करत असलेली विखारी टीका लोकांना रूचली नाही. दररोज गांधी परिवारावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून केलेली टीका म्हणजे सत्तेचा दर्प असल्याची टीका पवार यांनी केली. 

दरम्यान रिझर्व्ह बॅंक, सीबीआयसह इतर संवैधानिक संस्थाच मोदींनी सरकारच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. नोटाबंदीचे अपयश लपवण्यासाठी आरबीआय वर अशा प्रकारे अंकूश आणणे हे जनतेला मान्य नव्हते. त्याचे पडसादच या पाचही राज्यातील निवडणूकीत उमटल्याचे पवार म्हणाले. 2019 ला देशात व राज्यात निश्चीतच सत्तांतर होईल, असा दावा करत शिवसेना भाजप युतीनेच निवडणूका लढतील असेही पवार म्हणाले 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, असेही पवार म्हणाले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख