30 हजार ऊसतोड कामगार महिलांनी गर्भाशय काढले - नितीन राऊत

ऊसतोड कामगारांच्या तांड्यातील 25 ते 30 वर्षाच्या 30 हजार महिलांनी आपले गर्भाशय काढून घेतले आहे, गर्भाशय काढणे म्हणजे आपल स्त्रित्त्व संपवणे आहे, अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
30 हजार ऊसतोड कामगार महिलांनी गर्भाशय काढले - नितीन राऊत

अमरावती - ऊसतोड कामगारांच्या तांड्यातील 25 ते 30 वर्षाच्या 30 हजार महिलांनी आपले गर्भाशय काढून घेतले आहे, गर्भाशय काढणे म्हणजे आपल स्त्रित्त्व संपवणे आहे, अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी दिली.

अमरावतीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन टप्यात कर्जमाफी केल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन राऊत यांनी `सरकारनामा'सोबत संवाद साधला.

मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्हा अति मागासलेला आहे. त्या ठिकाणी रोजगार नसल्याने अनेक महिला पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून जातात. ऊस तोडणीचे काम हे सहा ते सात महिन्याचे असते. त्यादरम्यान त्यांना मासिक पाळी येते. त्यावेळी त्यांना चार दिवस सुट्ट्या घ्यावी लागते आणि त्याचे पैसे त्यांना मिळत नाही. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. त्यामुळे तेथील तरुण 25 ते 30 वर्षाच्या 30 हजार महिलांनी आपले गर्भाशय काढून घेतले आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितलं. गर्भाशय काढणे म्हणजे आपले स्त्रित्व संपवणे आहे, असेही राऊत म्हणाले.  

याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शासनाने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

तसंच, गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची 2 लाख खाती खाजगी अक्सिस बँकेत उघडली. शासनाची खाती ही राष्ट्रीयकृत बँकेत असतात. मागील पाच वर्षातील निर्णय चुकीचा होता. आम्ही ते दुरुस्त करू असंही नितीन राऊत यांनी सांगितलं तसंच गृहमंत्रिपद हे शिवसेनेकडे राहणार असल्याचंही यावेळी नितीन राऊत यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com