3 mps and mlas from pcmc stay away form bandh | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे तीन खासदार आणि तीन आमदार `बंद`पासून दूरच #MaharshatraBandh

उत्तम कुटे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पिंपरी : राजकारण्यांना आपल्या आंदोलनापासून प्रथमपासून दूर ठेवल्याने सकल मराठा समाजाच्या कालच्या राज्य बंदमध्येही पिंपरी-चिंचवडमधील आमदारांनी चार हात दूर राहणेच काल पसंत केले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शहरातील शिवसेनेचे दोन (शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि मावळचे श्रीरंग बारणे) आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य अमर साबळे) हे दिल्लीतच असल्याने ते आपोआप बंदपासून दूर राहिले. 

आरक्षणासाठी भरीव प्रयत्न न केल्याने आपल्या समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्र्याविषयी मराठा समाजात चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनात समाजाने त्यांना व इतर लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य केले आहे. त्यांना आपल्या आंदोलनापासून दूर ठेवण्याची खबरदारीही त्यांनी घेतली आहे. मात्र, काही आमदारांनी राजीनामे दिल्याने ते त्यात सामील होत आहेत.
 
मराठा आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा असूनही या पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार ऍड गौतम चाबुकस्वार यांनी या बंदपासून चार हात दूर राहणे पसंत केले. बंदमधील ठिय्या आंदोलनात सहभागी झालो,तर अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता गृहीत धरून ते दूरच राहिले होते..

अशीच स्थिती शहरातील दुसरे आमदार भोसरीचे भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांचीही झाली. ते भोसरीतील ठिय्या आंदोलनापासून दूरच होते. नंतर ते जवळ गेले. मात्र, व्यासपीठावर ते गेले नाहीत. त्यामुळे भाषण करणे दूरच राहिले. भाजपचे शहरातील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी परवाच आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. तसेच समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख