2,98,000 शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत समावेश

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत तब्बल दोन लाख 98 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 29) गावनिहाय याद्या प्रसिध्द करण्यात आल्या.
298000 farmers included in second list of loan waiver
298000 farmers included in second list of loan waiver

सोलापूर : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवर हल्लाबोल चढविला. 
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याने या गतीने कर्जमाफीसाठी 460 महिन्यांचा कालावधी लागेल, अशी टिकाही त्यांनी केली. या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत तब्बल दोन लाख 98 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 29) गावनिहाय याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. 

तत्कालीन फडणवीस सरकारने राज्यातील बळीराजाला दीड लाखांची कर्जमाफी दिली, मात्र ऑनलाइन लाभ देण्यात आला. त्यातील असंख्य तांत्रिक चुकांमुळे शंभरहून अधिकवेळा त्यांना जिल्हाधिकारी व सहकार विभागातील अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यावी लागली. त्याला टस्सल देत ठाकरे सरकारने पहिल्या टप्प्यात दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. 

अवघ्या काही दिवसांतच बॅंकांकडून माहिती मागवून आपले सरकार सेवा केंद्रातून आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायला सुरवात केली. त्यामुळे फडणवीस सरकारने विधिमंडळात संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमाफीच्या गतीचा मुद्दा उचलत सरकारवर टीका केली. आता महाविकास आघाडी सरकारने दुसरी यादी सुमारे तीन लाख शेतकऱ्यांची जाहीर केली. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी असल्याने विरोधक चांगलेच पेचात अडकले आहेत. नेमके कोणत्या मुद्‌द्‌यावर नव्या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरायचे, असा प्रश्‍न विरोधकांना पडल्याचे चित्र आहे. 

निवडणूक आयोगाकडून मागविले मार्गदर्शन 
राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. त्यामुळे राज्यातील 19 जिल्ह्यातील एक हजार 570 गावांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ महिनाभर लांबणीवर पडला आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले, परंतु त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सहकार विभागाचे अप्पर आयुक्‍त डॉ. अनिल जोगदंड यांनी सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com