बीड पाेलिसांनी ‘काेराेना राेखला; तबलीगींच्या संपर्कातील पोलिसांचे अहवालही निगेटीव्ह आले

धावत असलेल्या रेड्यावर बसलेला यमसदृश्य कोरोना व समोर हातात दंडुका असलेला पोलिस कर्मचारी त्याला अडवित असल्याचे चित्र व बीडकरांचे आशीर्वाद कामी आले अशा मजकुराची पोस्ट पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.
29 suspected corona patients from beed police tested negative
29 suspected corona patients from beed police tested negative

बीड : कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी उपाय योजनांची कडक अंबलबजावणी करुन राज्यासमोर दिशादर्शक पॅटर्न ठेवणाऱ्या बीडकरांची दोन दिवस ‘त्या’ तबलीगींमुळे वाढलेली ऱ्हदयाची धडधड अखेर सोमवारी सायंकाळी शांत झाली. तबलीगींच्या संपर्कात आलेल्या २९ पोलिसांसह इतर चार ३३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.

दरम्यान, धावत असलेल्या रेड्यावर बसलेला यमसदृश्य कोरोना व समोर हातात दंडुका असलेला पोलिस कर्मचारी त्याला अडवित असल्याचे चित्र व बीडकरांचे आशीर्वाद कामी आले अशा मजकुराची पोस्ट हर्ष पोद्दार यांनी फेसबुकवर पोस्ट करुन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणी करुन बीडने राज्यासमोर दिशादर्शक पॅटर्न ठेवला आहे. संचारबंदी, जमावबंदी व लॉकडाऊन आदी आदेशाची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होत आहे. उल्लंघन केल्याचे आतापर्यंत ६६८ जणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. सर्वाधिक स्थलांतरीत असलेल्या जिल्ह्यात १४ चेकपोस्टवर ६० हजारांवर बाहेरुन येणाऱ्यांची पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्यविषयक व प्रवासविषयक माहिती घेण्याचा पॅटर्नही जिल्ह्यातच राबला. 

गावपातळीवरही बाहेरुन आलेल्यांचे फेरसर्व्हेक्षण आणि गरजेनुसार आरोग्य तपासणी करण्यात आली. संचारबंदीत शिथिलतेची सर्वात कमी वेळही जिल्ह्यातच ठेवली गेली. परिसरातील जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाही रविवार पर्यंत जिल्हा शुन्यावर होता. यात पोलिस दलाचे काम महत्वपूर्ण राहीले. परंतु, तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या १२ जणांपैकी आठ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यांचा बीडच्या २९ पोलिस/होमर्गाडसह इतर चार अशा ३३ जणांशी संपर्क  आल्याचे समोर आले. या पोलिसांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

जालनाहून लातूरकडे जाताना या तबलीगींना बीड पोलिसांनी शहागड चेकपोस्टवर अडविले होते. त्यावेळी तबलीगींनी पोलिसांशी हुज्जतही घातली होती. त्यामुळे बीडमुक्कामाचा बेत फसून हे तबलीगी शहागड येथे मुक्कामी राहीले व नंतर दुसऱ्या मार्गे लातूरकडे रवाना होत असताना पुन्हा त्यांना चौसाळा चेकपोस्टवर अडविले. त्यामुळे शुन्यावर असलेल्या बीडकरांची काळजी वाढली होती. 

अगदी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यावेळी सोशल मिडीयावर ‘या सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह यावेत यासाठी संपूर्ण बीड व पोलिस दल प्रार्थना करत आहे’ आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दाखविणारी पोस्ट केली होती. अखेर सोमवारी सायंकाळी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरही त्यांनी वरिलप्रमाणे भावना व्यक्त केल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com