पूर्व हवेलीत मातब्बर 25 कार्यकर्ते शिवसेनेत; आढळराव व कटकेंची मोर्चेबांधणी यशस्वी

पूर्व हवेलीत मातब्बर 25 कार्यकर्ते शिवसेनेत; आढळराव व कटकेंची मोर्चेबांधणी यशस्वी

लोणी काळभोर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमानात इनकमिंग होत असताना, पूर्व हवेलीत मात्र शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व हवेली तालुका खऱेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी लोणी काळभोरच्या आजी- माजी सरपंचासह, माजी जिल्हा परीषद सदस्य, यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी संचालक अशा 25 अधिक जणांनी शुक्रवारी (ता. 2) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत दत्तात्रेय काळभोर, लोणी काळभोरच्या विद्यमान सरपंच अश्विनी गायकवाड, माजी सरपंच वंदना काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड व त्यांच्या 25 हून अधिक सहकाऱ्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीबरोबरच लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर भगवा फडकला आहे. 

हवेली तालुक्याच्या राजकारणात यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदाप कंद यांचे विश्वासू म्हणुन प्रशांत काळभोर यांची तालुक्यात ओळख आहे. प्रशांत काळभोर यांची दहा वर्षांपासुन लोणी काळभोर ग्रामपंचायत व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर एकहाती सत्ता आहे.

शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्याशी आठ वर्षापुर्वी मतभेद झाल्यापासुन, प्रशांत काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी जवळीक वाढवली होती. यामुळे प्रशांत काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणुकीत प्रशांत काळभोर यांनी लोणी काळभोर व परीसरात शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रचारधुरा एकहाती हाकली होती. या निवडणुकीत आढळराव हारले तरी, आढळराव व शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी प्रशांत काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेनेत घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती. यात आढळराव व कटके यांना यश आले असुन, लोणी काळभोर सारखी मोठी ग्रामपंचायत पक्षाकडे आली आहे. 

दरम्यान प्रशांत काळभोर यांच्या बरोबर माजी जिल्हा परीषद सदस्य संजय गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रताप शंकर बोरकर, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजेश दत्तात्रय काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड, माजी सरपंच वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, विजय ननवरे, पांडुरंग केसकर, रेखा काळभोर, मंगल बनकर, संगीता काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षा अनिता काळभोर, संस्थेचे माजी हेमंत गंगाराम गायकवाड आदींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com