25 FIR have been lodged in irrigation scam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सिंचन घोटाळ्यात 25 पेक्षा जास्त एफआयआर दाखल केले आहेत :  फडणवीस

दीपक क्षीरसागर
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

आतापर्यंत जवळपास साठ प्रकरणात शिक्षा झाली आहे.

-देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद  : "सिंचन घोटाळ्यात सातत्याने कारवाई सुरू आहे. शंभरपेक्षा जास्त प्रकरणात फिर्याद दाखल करण्यात आली आहे,'' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्‍नाची उत्तरे देताना श्री. फडणवीस म्हणाले, "आतापर्यंत जवळपास साठ प्रकरणात शिक्षा झाली आहे. न्यायालयात जे फौजदारी खटले दाखल झाले आहेत त्यातही आपण दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. पंचवीसपेक्षा जास्त एफआयआर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. न्यायालयाने आणखी माहिती मागविली आहे. ती आम्ही देणार आहोत.''

उसाच्या प्रश्‍नाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "उसाला पाणी जास्त लागते म्हणून ऊस लावू नका असे म्हणता येणार नाही. त्याऐवजी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात उसाचे अधिक उत्पादन घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म सिंचनासाठी वाढीव तरतूद शासनाने केली आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख