आजचा वाढदिवस : आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, वैजापूर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)  - | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, वैजापूर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 एप्रिल 2018

वडील सरपंच असल्याने घरातील वातावरण सुरवातीपासूनच राजकीय होते. भाऊसाहेब यांचे बंधू दिवंगत कैलास पाटील चिकटगांवकर वैजापूरचे आमदार होते. त्या काळात भाऊसाहेब पाटील राजकारणात सक्रिय झाले. वैजापूर नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यावरच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग आला. 2004 व 2009 वैजापूर येथून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. 2014 मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर वैजापूरमधून विजयी झाले. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे.

वडील सरपंच असल्याने घरातील वातावरण सुरवातीपासूनच राजकीय होते. भाऊसाहेब यांचे बंधू दिवंगत कैलास पाटील चिकटगांवकर वैजापूरचे आमदार होते. त्या काळात भाऊसाहेब पाटील राजकारणात सक्रिय झाले. वैजापूर नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यावरच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग आला. 2004 व 2009 वैजापूर येथून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. 2014 मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर वैजापूरमधून विजयी झाले. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी विजया चिकटगांवकर याही काही काळ औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख