आजचा वाढदिवस : प्रकाश सोळंके, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

आजचा वाढदिवस : प्रकाश सोळंके, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र असलेले प्रकाश सोळंके सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणास सुरूवात केलेल्या प्रकाश सोळंके यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम केले. माजलगाव मतदार संघातून तीन वेळा आमदार राहीलेले प्रकाश सोळंके यांनी आघाडी सरकारच्या काळात सहकार, महसूल आणि मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले. सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. माजलगांव मतदारसंघामध्ये बाजार समिती, पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com