मोनिका राजळेंना पुन्हा सक्रीय करण्यासाठी पंकजा मुंडेंचा पुढाकार

माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या निधनानंतर या दुःखातून अद्यापही न सावरलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे या साठी आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी पुढाकार घेतला असून येत्या मंगळवारी (ता. 9) स्वतः मुंडे या राजळे यांच्याकडे कासार पिंपळगाव येथे येत राजळे यांना बाहेर पडण्याचे आवाहन करणार आहेत. राजळे या आपली दुसरी राजकीय इनिंग पुन्हा सुरु करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मोनिका राजळेंना पुन्हा सक्रीय करण्यासाठी पंकजा मुंडेंचा पुढाकार

पाथर्डी : माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या निधनानंतर या दुःखातून अद्यापही न सावरलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे या साठी आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी पुढाकार घेतला असून येत्या मंगळवारी (ता. 9)  स्वतः मुंडे या राजळे यांच्याकडे कासार पिंपळगाव येथे येत राजळे यांना बाहेर पडण्याचे आवाहन करणार आहेत. राजळे या आपली दुसरी राजकीय इनिंग पुन्हा सुरु करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

माजी आमदार राजीव राजळे यांचे 7 ऑक्टो. 2017 17 रोजी निधन झाल्याने राजळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात होण्या बरोबरच राजळे यांना मानणारे कार्यकर्ते चांगलेच सैरभर झाले. या घटनेला तीन महिने उलटूनही मोनिका राजळे या दुःखातून न सावरल्याने त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. या पार्शवभूमीवर राजळे समर्थक कार्यकर्त्यांनी राजीव राजळे व स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीचे औचित्य साधत हिंमत सप्ताह राबवत तसेच विविध उपक्रम आयोजित करत राजळे यांनी सक्रिय व्हावे असे आवाहन केले.

मात्र तरीही राजळे या बाहेर न पडल्याने आज पाथर्डी व शेवगाव चे भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, बापूसाहेब पाटेकर,नगराध्यक्ष डॉ. मृत्युन्जय गर्जे, पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर हे परळीला गेले व त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मोनिका राजळे यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या असे आवाहन केल्या नंतर मुंढे यांनी आपण येत्या मंगळवार दि. 9 रोजी कासार पिंपळगाव येथे दुपारी एक वाजता येऊन राजळे यांचेशी चर्चा करुन त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करु असे आश्वासन दिले दरम्यान या भेटी नंतर मुंडे या राजळे यांना आपल्या सोबत नगर येथील एका कार्यक्रमाला घेऊन जाणार असल्याचे अधिक माहिती घेता समजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com