19 MLA's suspended from Maharashtra Assembly over ruccus | Sarkarnama

विधानसभेत विरोधी 19 आमदरांचे निलंबन

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 मार्च 2017

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी करत असून शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी करणे, हा गुन्हा असल्याचे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे- राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई - विधानसभेच्या कामकाजचा आजच्या अकराव्या दिवशी मोठा गादारोळ झाला. शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्या 10 तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांचा समावेश आहे. आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर होताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेत सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी विरोधी आमदारच उपस्थीत नसल्याने विधानसभेचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दिवभरासाठी विधानसभा तहकूब केली.

सकाळी आज 10 वाजता कामकाजाला सुरवात होताच 31 डिसेंबरपर्यंत 19 आमदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो सभाग्रहात अवाजी मतदानाने मान्य करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी या निर्णयाचा निषेध करत सभात्याग केला.

निलंबीत आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी करत असून शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी करणे, हा गुन्हा असल्याचे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकष्ण विखे पाटील यांनी आपण सभात्याग करत असल्याचे सांगितले. यानंतर विरोधकांशी चर्चा करण्यास कामकाज अर्धातासासाठी तहकूब करण्यात आले. तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच डाँ विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ विधेयक संमत करण्यात आले तर महाराष्ट्र परावैद्यक परिषद सुधारणा विधेयक मांडण्यात आले. अर्थसंकल्पावर चर्चा करणे हा विरोधकांचा हक्क आहे. त्यामुळे विरोधकांशी कामकाजात सहभागी होण्यासाठी चर्चा करण्याचे सांगत कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

खालील आमदारांना निलंबित करण्यात आले आहे :-

अमर काळे – आर्वी मतदारसंघ, वर्धा
संग्राम थोपटे – भोर, पुणे
विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी मतदारसंघ
अब्दुल सत्तार - औरंगाबाद
हर्षवर्धन सकपाळ – बुलडाणा
डी.पी. सावंत – नांदेड उत्तर
अमित झनक –  रिसोड
कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
राहुल जगताप – चिखली, बुलडाणा
जयकुमार गोरे - माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
भास्कर जाधव –  गुहागर मतदारसंघ
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा- कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – गंगाखेड
संग्राम जगताप – अहमदनगर
अवधूत तटकरे – श्रीवर्धन
-दीपक चव्हाण – फलटण – सातारा
नरहरी जिरवाळ – दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड- अकोले – अहमदनगर
दत्ता भरणे –  इंदापूर, पुणे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख