हेच ते बंडाळी केलेले काॅंग्रेसचे 19 आमदार!

....
congress mla form mp
congress mla form mp

पुणे : मध्य प्रदेशातील काॅंग्रेसच्या 19 आमदारांनी आपले राजीनामे दिले असून हे सर्व आमदार बेंगळूरमध्ये आहेत. त्यांनी तेथील पोलिस महासंचालकांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. काॅंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर या आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

आम्ही आमच्या मर्जीने काही कामासाठी मध्य प्रदेशमध्ये आलो आहेत. आम्हाला येथे फिरण्यासाठी पोलिस संरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काॅंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही सरकार वाचविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या  सहा मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. शिंदे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारता काॅंग्रेसने त्यांची हकालपट्टीची घोषणा केली. 

 काॅंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या काॅंग्रेस सदस्यत्वाज आज राजीनामा दिला. पक्षाशी आपले 18 वर्षांचे असलेले संबंध तोडून नवी सुरवात करत असल्याचे शिंदे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

मध्य प्रदेशच्या जनतेशी सेवा करण्यासाठी आपण कार्यरत राहत असल्याचे सांगत शिंदे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी गेल्या वर्षभरापासून आपले मार्ग वेगळे असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या साऱ्या पत्रात त्यांनी राहुल गांधींचे नावही घेतलेले नाही. राहुल यांच्या ब्रिगेडमधील ओळखले जाणारे ज्योतिरादित्य त्यांच्यापासून दूर झाले. त्यांनी राहुल यांच्याविषयी कोणतीच भावना अथवा मत आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केलेले नाही. त्यामुळेच पक्षातून त्यांच्या गच्छंतीला राहुल हेच कारणीभूत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिल्याचे बोलले जात आहे. 

राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितीन प्रसाद, प्रिया दत्त, राजीव सातव, अलका लांबा, अशी नावं काँग्रेसमध्ये राहुल ब्रिगेडचे सदस्य म्हणून ओळखली जात होती. त्यात ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जात होते. 2009मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पुन्हा यूपीएचे सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. त्यानंतर काँग्रेसमध्येच नव्हे तर, देशात राहुल गांधी यांच्या राहुल ब्रिगेडची खूप चर्चा सुरू होती. देशात तरुण नेतृत्वाची पुढची फळी तयार करण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांनी तरुण नेत्यांची मोट बांधली होती. पण, दहा-बारा वर्षांत फासे असे काही फिरले की, राहुल गांधींची ही ब्रिगेड काँग्रेसला तारू तर शकली नाहीच. पण, त्यातले मोहरीही निखळू लागले. देशभरात काँग्रेसचा पराभव होत असताना गेल्या पाच वर्षांत ही राहुल ब्रिगेड कुठं होती, असा प्रश्न पडतो. यातल्या केवळ सचिन पायलट या एका नेत्यानेच राजस्थानात गावात गावात जाऊन काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. सध्या ते राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्र, मुंबई तर सोडाच कुलाब्याच्या बाहेरही मजल मारता आली नाही.

मुळात वडील माधवराव शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावंत. 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात आले. रिक्त झालेल्या उत्तर प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनित्व त्यांनी केले. पोटनिवडणुकीत साडे चार लाख मतांनी ते विजयी झाले. माधवराव शिंदे राजीव गांधींचे विश्वासू तर, ज्योतिरादित्य राहुल गांधींचे, असे समीकरण झाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती. पण, मध्य प्रदेशात छिंदवाडामध्ये कमलनाथ आणि गुनाममध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी विजय मिळवून अक्षरशः वादळात दिवा लावला होता. त्याची पुनरावृत्ती ज्योतिरादित्य शिंदे यांना 2019मध्ये करता आली नाही. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काहींसे अस्वस्थ झाले. मुळात लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्रिपदाची आस होती. पण, काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अनुभवी कमलनाथ यांच्यावर विश्वास टाकला. तिथं ज्योतिरादित्य शिंदे यांचा अपेक्षाभंग झाला.


मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह असे काँग्रेसचे तीन गट आहे. हे गट असूनही राज्यात काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळवता आल्या होत्या. पण, दैव देतं आणि कर्म नेतं, अशी अवस्था काँग्रेसची आहे. एका राज्यातील तीन नेत्यांना सांभाळणं, त्यांना शांत करणं, काँग्रेस नेत्यांना जमलं नाही. विशेषतः राहुल गांधी यांना त्यांच्याच फळीतील विश्वासू मित्राची मनधरणी करणं, शक्य चा ननाही. त्यामुळं ज्योतिरादित्यांची बंडखोरी याही पेक्षा काँग्रेसचं अपयश म्हणूनही याकडं पहावं लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com