कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे 16 आमदार आमच्या संपर्कात : रावसाहेब दानवे 

.
Raosaheb_Danve
Raosaheb_Danve

औरंगाबाद: " कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी 16 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत.एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत," असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता.17) येथे केला. 

चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्‍यातील सरपंच,उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी दानवे व बागडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर दानवे बोलत होते. 

दानवे म्हणाले,"  विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 41 पैकी काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांग लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचार घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. "

" पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्‍कीच न्याय मिळतो", असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे 370 आणि 35 अ हे कलम रद्द करण्यात आल्याने देशभरात भाजपबाबत विश्‍वासाची भावना निर्माण झाली असून, त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूकदेखील कॉंग्रेसच्या हातून गेली असल्याचा टोला दानवे यांनी लगावला. 

देशभरातील गोदामांमध्ये गरजेच्या तुलनेत दीडपट धान्याचा साठा पडून आहे. त्यामुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याच्या कोट्यात प्रतिकुटुंब दरमहा 35 किलोवरून 40 किलोची वाढ करण्यात आल्याचेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com