15 Lacks will be deposited in Accounts Soon Claims Ramdas Athavle | Sarkarnama

खात्यांवर 15 लाख होतील हळूहळू जमा : रामदास आठवले

धर्मवीर पाटील
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

''सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन सरकारने फसवणूक केलेली नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे पैशाची मागणी केली; मात्र बँकेकडेही इतकी रक्कम उपलब्ध नाही. पंधरा लाख एकदम जमा करणे शक्य नसले तरी हळूहळू आम्ही ते जमा करू.", असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

इस्लामपूर : ''सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन सरकारने फसवणूक केलेली नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे पैशाची मागणी केली; मात्र बँकेकडेही इतकी रक्कम उपलब्ध नाही. पंधरा लाख एकदम जमा करणे शक्य नसले तरी हळूहळू आम्ही ते जमा करू.", असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांचा पुतण्या साकेत याच्या खुनाच्या प्रकारानंतर ते कांबळे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आज येथे आले होते. या खुनाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "तीन राज्यात भाजप हरली असली तरी काँगेसने फार मोठ्या फरकाने बहुमत मिळविलेले नाही. विरोधकांच्यामध्ये एकी नाही. २०१९ च्या निवडणुकीत मोदिंचीच सत्ता येईल. विरोधक अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. या पराभवामुळे आम्ही गंभीर झालो आहोत. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. कर्जमाफी, इंधन भाववाढ रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या निवडणुकीतही आम्ही भाजपासोबतच जाणार आहोत. मोदी सरकारने बाबासाहेबांची घटना जपण्याचे आणि दलितांच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देशातील दलीतबंधाव त्यांच्यासोबत राहातील."

ते पुढे म्हणाले, "राज्यात भाजप शिवसेनेने एकत्रच राहायला हवे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटप करताना ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे ठरवून घ्यावे किंवा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री याबाबत चर्चेतून निर्णय घ्यावा. आरपीआयला लोकसभेच्या किमान २ जागा मिळाव्यात. राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांच्याबाबत मी मध्यस्थी करणार आहे. सध्या शेट्टी गेले तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणून सदाभाऊ आमच्यासोबत आहेत. ईव्हीएम हवे की नको यावर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. तरीही या निवडणुकीत ते अशक्य आहे. न्यायालयाने राफेल बाबत क्लीनचिट दिलीय, पण विरोधकांच्याकडे दुसरा मुद्दा नसल्याने त्यांचे आरोप सुरूच आहेत. आम्ही येत्या चार महिन्यात सर्व हवा बदलून टाकू. त्यामुळे २०१९ ला पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल."  मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी मोदींना सोडून चूक केली. सर्वच शेतकरी शेट्टींच्या सोबत नाहीत, सदभाऊंच्याही मागे आहेत, असेही आठवले म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख