| Sarkarnama

हरित सेनेकडे जनतेची  पाठ, सदस्य वाढविण्याचे आव्हान

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 29 मे 2017

मुंबई : वृक्षारोपनात राज्यातील जनतेचा सहभाग वाढावा या संकल्पनेतून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थापन केलेल्या हरित सेनेकडे आता जनतेनेच पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

मे 2017 पर्यंत हरित सेनेचे एक कोटी सदस्य बनविण्याचा संकल्प वन मंत्रालयाने सोडला होता.तथापि जेमतेम 30 टक्केही सदस्य जमविण्यास हरित सेनेला अपयश येत असल्याचे पाहून एक महिन्याची मुदतही वाढविण्यात आली.30जून 2017 च्या अखेरीपर्यत हरित सेनेचे सदस्य वाढविण्यात येणार आहेत. 

येत्या तीन वर्षात महाराष्ट्रात 50 कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्धार मनगुंटीवार यांनी व्यक्त केला असून यावर्षी 4 कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा निर्धार असला तरी प्रत्यक्षात यंदाच्या पावसाळ्यात 6 कोटीपेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यासाठी वने मंत्रालयाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती वन मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे. 

गेल्या वर्षी मनगुंटीवार यांनी 2 कोटी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला होता. तथापि 1 जुलै 2016 या एकाच दिवशी तब्बल 2 कोटी 82 लाख वृक्षारोपण करण्यात आले. याही वर्षी 1 जुलै ते 7जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्षारोपण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा संकल्प मनगुंटीवार यांनी सोडला असून त्यांनी आढावा घेण्यासही सुरूवात केली आहे. वन मंत्रालयाकडून हरित सेनेच्या सदस्य वाढविण्याकरिता एक महिन्याची मुदत वाढविण्यात आली असली तरी हरित सेनेची सदस्य संख्या एक कोटी होणे अशक्‍य असल्याची माहिती सूत्रानी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख