12 officers promoted to IAS rank | Sarkarnama

महाराष्ट्रातील 12 अधिकाऱ्यांना आयएएसची पदोन्नती

तुषार खऱात
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे. दोन ते चार वर्षे विलंबाने बहुतांश अधिकाऱ्यांच्या पदोन्नती होत आहेत. त्यामुळे अशा पात्र अधिकारी वर्गामध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पदोन्नती झालेले 12 अधिकारी नशिबवान ठरल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या सेवेत कार्यरत असलेल्या 12 अधिकाऱ्यांची "भारतीय प्रशासकीय सेवे'त (आयएएस) पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारच्या "पर्सोनल ऍण्ड ट्रेनिंग' विभागाने नुकताच आदेश जारी करून या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.

व्ही. व्ही. माने, एम. एम. सुर्यवंशी, आर. एच. ठाकरे, जे. एस. पापळकर, एस. डी. मांढरे, एस. जी. कोल्हे, आर. डी. निवतकर, ए.के. ढाकणे, ए. ए. गुल्हाणे, के. व्ही. जाधव, जी. एम. बोडके, सी. के. डांगे अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे. दोन ते चार वर्षे विलंबाने बहुतांश अधिकाऱ्यांच्या पदोन्नती होत आहेत. त्यामुळे अशा पात्र अधिकारी वर्गामध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पदोन्नती झालेले 12 अधिकारी नशिबवान ठरल्याचे बोलले जात आहे.

पदोन्नती झाल्याने या अधिकाऱ्यांची आता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सहआयुक्त, आयुक्त अशा आयएएस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या पदांवर नियुक्ती होईल, असे सूत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख