| Sarkarnama

संभाजी पाटील निलंगेकरांचे ओएसडी राजेंद्र गोळे स्वगृही

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई: कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून वर्षभरापासून कार्यरत असलेले राजेंद्र गोळे कार्यमुक्त झाले आहेत. ते आता आपल्या महसूल या मूळ खात्यात परतले आहेत.

मुंबई: कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून वर्षभरापासून कार्यरत असलेले राजेंद्र गोळे कार्यमुक्त झाले आहेत. ते आता आपल्या महसूल या मूळ खात्यात परतले आहेत.

खासगी सचिव (पीएस), ओएसडी अशा पदांवरील व्यक्तींना पाच वर्षे काम केल्यानंतर मुदतवाढ घेणे आवश्यक आहे. पण गोळे यांना सरकारने मुदतवाढ दिली नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच या मुदतवाढीला विरोध असल्याचे सांगण्यात येते. गोळे हे विनोद तावडे यांचे अत्यंत निकटचे अधिकारी आहेत. तावडे विरोधी पक्षनेते असल्यापासून गोळे त्यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत होते. नव्या सरकारमध्ये तावडेंना शिक्षणमंत्री पद मिळाल्यानंतर तिथेही गोळे ओएसडी म्हणून रूजू झाले होते. 

तर विद्याधर महाले हे पीएस म्हणून रूजू झाले होते. पण महाले व गोळे या जोडगोळीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडेच गंभीर तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी या दोघांचीही उचलबांगडी केली होती. 

महाले यांची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पीएस म्हणून, तर गोळे यांची निलंगेकर यांचे ओएसडी म्हणून मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली होती. वर्षभर तिथे काम केल्यानंतर आता गोळे यांचा एकूण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यांना मुदतवाढ मिळाली नसल्याने स्वगृही परतावे लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख