109 illeterate candidates in 3 municipal elections | Sarkarnama

तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीत 109 निरक्षर उमेदवार

संजीव भागवत
शनिवार, 15 एप्रिल 2017

लातूर, चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांच्या निवडणुका 19 एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीत तब्बल 109 उमेदवारांनी शाळेची पायरीही चढली नसल्याने ते निरक्षर असल्याची माहिती समोर आली आहे. पाचवी आणि केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असून त्याउलट पदव्यूत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ही अत्यंत अल्प आहे.

मुंबई - लातूर, चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांच्या निवडणुका 19 एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीत तब्बल 109 उमेदवारांनी शाळेची पायरीही चढली नसल्याने ते निरक्षर असल्याची माहिती समोर आली आहे. पाचवी आणि केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असून त्याउलट पदव्यूत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ही अत्यंत अल्प आहे. तर डॉक्‍टरेट स्तरावरील पदवी घेणारा एकच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे या उमेदवारांनी दिलेल्या माहितीतून दिसून आले आहे.

मराठवाड्यातील लातूर आणि परभणी तर विदर्भातील चंद्रपूर या महानगरपालिकांसाठी 19 एप्रिल रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये परभणी महापालिकेच्या निवडणुकीत 73, लातूर-27 आणि चंद्रपूर महापालिकेत केवळ 9 उमेदवारांनी शाळेची पायरीच चढली नसल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत दिली आहे.तर पाचवी, आणि आठवीपर्यंतच कसेबसे शिकलेल्या उमेदवारांचीही संख्या ही अधिक असून त्या तुलनेत या तीनही महापालिकेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ही केवळ 79 इतकीच आहे. 109 म्हणजेच एकुण उमेदवारांच्या 9 टक्‍के निरक्षर उमेदवार या तीन महापालिकेतील नागरिकांचे भवितव्य ठरविण्यासाठी मैदानात आहेत.

त्यांच्यासोबतच पाचवीपर्यंत शाळेत गेलेल्यांची उमेदवारांची संख्या ही 114 म्हणजचे 16 टक्‍के इतकी असून आणि आठवीपर्यंतच्या उमेदवारांची संख्या ही 197 इतकी तर दहावीपर्यंतचे 226 आणि बारावीपर्यंतचे 238 उमेदवार उभे आहेत.
चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागांसाठी 460, लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी 406 आणि परभणी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी 418 उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक निरक्षर उमेदवारांचे प्रमाण हे परभणीत 73 इतके असून त्याखालोखाल लातूर महापालिकेत 27 उमेदवार आहेत.

पाचवीपर्यंतचे शिक्षण सर्वात शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या ही चंद्रपूर महापालिकेत आहे. येथे 39 उमेदवार हे केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. त्याखालोखाल परभणी-38 आणि लातूरमध्ये 37 इतकी संख्या आहे तर आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची सर्वांधिक संख्या ही परभणीत 39 इतकी आहे. तर त्याखालोखाल चंद्रपूर-64 आणि लातूर-63 इतकी आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख