नवे जीआर- शासनाचे वृक्षसंवर्धन पुरस्कार जाहीर

नवे जीआर- शासनाचे वृक्षसंवर्धन पुरस्कार जाहीर

मुंबई- वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दिले जातात. शासनाने आज या पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. हे पुरस्कार 2015 सालासाठी आहेत.

तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद््ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचे बांधकाम व आराखडा नियंत्रणासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याचाही आदेश शासनाने आज जारी केला आहे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याचाही आदेश शासनाने काढला आहे.

या जीआरची माहिती खालील तपशीलात वाचकांना मिळू शकेल.
महसूल व वन विभाग     
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-2015 पुरस्कार प्राप्त व्यक्ती / संस्थांची नावे जाहीर करण्याबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201115062519.pdf

ग्राम विकास विभाग     
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी मा.पालकमंत्री सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत..............
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201526120420.pdf

भारतरत्न महर्षि कर्वे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगाव मौ. मुरुड, ता. दापोली येथे उभारण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत....
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201525217220.pdf

अन्य जीआर पुढीलप्रमाणे-
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग     
मौजे बहिरगांव (ता.कन्नड जि. औरंगाबाद ) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201633027228.pdf

मौजे आंबाला (ता.कन्नड जि. औरंगाबाद ) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201629040228.pdf

मौजे आंबा (ता.कन्नड जि. औरंगाबाद ) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201624372428.pdf

सार्वजनिक आरोग्य विभाग     
ग्रामीण रुग्णालय, नांदुरा जि. बुलढाणा येथील मुख्य इमारत व निवासस्थान बांधकाम.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201230026317.pdf
    
मौजे मानोरा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703201229491417.pdf

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com