10 thousand cycles to be distibuted in baramati | Sarkarnama

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात यंदा 10 हजार विद्यार्थिनींना सायकल मिळणार; सलमानही उपस्थित राहणार

मिलिंद संगई
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

बारामती शहर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून बारामती लोकसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थींनीना या वर्षात दहा हजार सायकलचे वाटप केले जाणार आहे. रविवारी (ता. 10) कात्रज (पुणे) येथे होणा-या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, सिनेअभिनेते सलमान खान व टाटा ट्रस्टचे मॅनेजींग ट्रस्टी आर. वेंकटरमण यांच्या प्रमुख उपस्थितीत या सायकलींचे वाटप केले जाणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलअभावी शिक्षणाला मुकावे लागू नये या उद्देशाने सन 2017 पासून सुप्रिया सुळे यांनी सायकल बँकची संकल्पना राबविली. या साठी अनेक हात पुढे आले आणि बघता बघता दोन वर्षांच्या कालावधीत या सायकलींचा आकडा 25 हजारांवर जाऊन पोहोचणार आहे. कोट्यवधी रुपयांची मदत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अनेकांनी देऊ केली असून दुस-या टप्प्यात टाटा ट्रस्ट या साठी पुढाकार घेत आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघात फिरताना अनेक ठिकाणी या लाल रंगाच्या सायकली जागोजागी दिसतात, मुली मोठ्या ऐटीत या सायकलवरुन शाळेत जाताना पाहायला मिळतात. यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली व खडकवासला या परिसरातील विद्यार्थींनीसाठी पाच हजार सायकलींचे वाटप रविवारी होत आहे. 

घरापासून शाळेचे अंतर लांब आहे व येण्याजाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही या कारणासाठी मुलींची शाळा बंद होऊ नये, शाळेतून मुलींची गळती होऊ नये या उद्देशाने सुळे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थींनींना सायकल मिळाल्यामुळे त्यांचा चालत येण्याजाण्याचा वेळ वाचत असून त्याचा फायदा त्यांच्या गुणवत्तेत अधिक वाढ होण्यात होत असल्याचे दिसत आहे.  सलमान खान यांच्या बिईंग ह्यूमन या संस्थेच्या वतीनेही काही प्रकल्पांसाठी पुढाकार घेतला जाणार असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख