पोलिसांची डोकेदुखी वाढली : `तबलीग मरकज`चे क्वारंटाईन केलेले दहा जण शिरूरमधून गायब

एक मार्चला संपर्क साधून त्यांच्या हातावर "होम क्वारंटाईन'चे शिक्के मारले व ते राहात असलेल्या संस्थेच्या प्रवेशद्वारावरही स्टीकर चिटकविले होते.
nijamuddin shirur
nijamuddin shirur

शिरूर : दिल्लीतील तबलीग मरकजमध्ये सहभागी झालेल्या आणि गेल्या सहा मार्चपासून शिरूरमध्ये जमातीच्या प्रचारासाठी आलेल्या दिल्लीतील दहाजणांनी गुरुवारी रात्री पलायन केले. त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माज गुलफाम कुरेशी, अनस महंमद इस्माईल, नसीम अहमद शमीम इहमद, आदिल शम्शी अब्दुल गफार, मोहमद अशहर इद्रिस, इकबाल इहमद चौधरी सिकंदर अली, शहेद यासीन, अब्दुला अफजल अन्सारी, अब्दुल रहेमान खालिक, शुमान जावेद खान (सर्व रा. आझाद मार्केट, दिल्ली) व हातीफ अल्लताप लाईक कुरेशी (रा. भाजी बाजार, शिरूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

दिल्लीत झालेल्या मरकस इस्तीमासाठी या व्यक्ती जमा झाल्या व तेथून पुण्यात आले. नाना पेठेतील चॉंदतारा मरकसमध्ये थांबल्यानंतर सहा मार्चला ते शिरूरला आले. तेव्हापासून ते येथील भाजीबाजार परिसरातील मकतब आरबी शिक्षण केंद्रात वास्तव्यास होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी संबंधितांशी एक मार्चला संपर्क साधून त्यांच्या हातावर "होम क्वारंटाईन'चे शिक्के मारले व ते राहात असलेल्या संस्थेच्या प्रवेशद्वारावरही स्टीकर चिटकविले.

दरम्यान, शुक्रवारी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे माहिती घेण्यासाठी गेले असता, संबंधित लोक तेथून पळून गेल्याचे निदर्शनास आले. संस्थेचे येथील काम पाहणारे हातीफ अल्लताप लाईक कुरेशी यांच्याकडे चौकशी केली असता, ते मालवाहतूक करणाऱ्या तीन ट्रकमधून निघून गेल्याचे निष्पन्न झाले.

 कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी पोलिसांची आणि प्रशासनाची तारांबळ आधीच उडाली आहे. त्यात हे होम क्वारटाईनवाले पळून गेल्याने त्यांचा शोध आता घ्यावा लागत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com