सत्कारापूर्वी पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. सुरुवातीला दुचाकी फेरीत पंकजा मुंडे उघड्या जीपमध्ये सहभागी झाल्या. नंतर त्यांची घोड्यावरुन मिरव | Sarkarnama

मराठा आरक्षण : घोड्यावर मिरवणुक काढून पंकजा मुंडेंचा सत्कार

सरकारनामा
गुरुवार, 11 जुलै 2019

परळी (जि. बीड) : राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले. आरक्षणासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा गुरुवारी परळीत सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी पंकजा मुंडे यांची घोड्यावर बसवून तलवार भेट देऊन मिरवणूक काढण्यात आली.

परळी (जि. बीड) : राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले. आरक्षणासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा गुरुवारी परळीत सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी पंकजा मुंडे यांची घोड्यावर बसवून तलवार भेट देऊन मिरवणूक काढण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघले. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याने परळीत ठोक मोर्चा काढून २१ दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात राज्यभर झालेल्या आंदोलनाचे परळी केंद्रबिंदु ठरले. आंदोलनालाही पंकजा मुंडे यांनी भेट देऊन ‘आरक्षणासाठी कटिबद्ध’ असल्याचे आश्वस्त केले होते. दरम्यान, आरक्षण देऊन ते न्यायालयातही टिकले आहे. त्याबद्दल त्यांचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला.

 सुरुवातीला त्यांनी शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुचाकी फेरी निघाली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जिजामाता सार्वजनिक उद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळयांनाही पंकजा मुंडे यांनी अभिवादन केले.

जय भवानी, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी शहर दणाणुन गेले. शिवाजी चौक, रेल्वेस्टेशन, टॉवर या मार्गावरून या रॅलीचा नटराज रंग मंदिर येथे समारोप झाला. या ठिकाणापासून त्यांची हाती तलवार देऊन घोड्यावर मिरवणुक काढण्यात आली. संयोजकाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जिजामाता सार्वजनिक उद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळयांनाही पंकजा मुंडे यांनी अभिवादन केले. 

दरम्यान, ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले. आपण विकास हिच जात मानतो असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडे आग्रही होते. माझं राजकारण हे भावनेचं नाही तर मी भावनेनं असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आमदार आर. टी. देशमुखही उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख