जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावितांची  बुलेट स्वारी, लई भारी! 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचेयुवक कॉंग्रेसतर्फे मोटार सायकल रॅली काढुन स्वागत झाले. मात्र यामध्ये चर्चेचा विषय ठरली जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा नयना गावित यांची धडधडत निघालेली बुलेट !
Nayana-Gavit-Bullette-ride
Nayana-Gavit-Bullette-ride

नाशिक :  कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी युवक कॉंग्रेसतर्फे मोटार सायकल रॅली काढुन त्याचे स्वागत झाले. मात्र यामध्ये चर्चेचा विषय ठरली जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा नयना गावित यांची धडधडत निघालेली बुलेट !  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या आडगाव नाका येथुन त्या बुलेटवर स्वार झाल्याने ती स्वारी चर्चेचा विषय ठरल्या. 

फैजपूरपासून सुरू झालेल्या जनसंघर्ष यात्रेचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले. शहरात आल्यानंतर आडगाव नाका येथे युवक कॉंग्रेसतर्फे वातावरण निर्मीतीसाठी कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे देखील मोटारसायकलवर स्वार झाले होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाईक रॅलीत घोषणा देत होते.

 मात्र अग्रभागी जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा नयना गावित बुलेटसह होत्या. धडधडत निघालेली बुलेट व घोषणा चर्चेचा विषय ठरला. या रॅलीचे नेत्यांनी देखील कौतुक केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नयना गावित यांची विचारपुस करीत प्रोत्साहन दिले. एकंदरच कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रीया पाहता धडधडत निघालेली नयना गावित यांची बुलेट लई भारी ठरली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com