zp president and ceo | Sarkarnama

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पत्नीचे निलंबन

सुधीर भारती
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

अमरावती : बदली होऊनही संबंधित शाळेत रुजू न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी तीन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबितांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नी सुजाता मोटघरे यांचाही समावेश आहे. सीईओंच्या या कारवाईमुळे मात्र चांगलीच खळबळ उडाली. जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नी सुजाता मोटघरे, सुनील यावलीकर तसेच संजय हिरूळकर यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. वरील तीनही शिक्षकांची धारणी पंचायत समितीला बदली करण्यात आली; मात्र सुजाता मोटघरे व सुनील यावलीकर हे दोघे रुजूच झालेले नाहीत, तर संजय हिरूळकर रुजू होऊन रजेवर गेलेत. 

तीनही शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी तीनही शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. जिल्हा परिषदेची बदलीप्रक्रिया यंदा चांगलीच गाजली. त्यात आता तीन शिक्षकांवरील निलंबन कारवाईमुळे ही प्रक्रिया चर्चेत आली. दरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी थेट अध्यक्षांच्या पत्नीवर निलंबनाची कारवाई केल्याने बदली नाकारणाऱ्या अन्य शिक्षकांत चांगलीच धडकी भरल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. 

आदेश पंचायत समितीला 
तीनही शिक्षकांवर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांचे निलंबन आदेश संबंधित पंचायत समितीला पाठविण्यात आले. पुढील कारवाई सुरू असल्याचे उपशिक्षणाधिकारी वामन बोलके यांनी सांगितले. मनीषा खत्री या शासकीय कामानिमित्त मुंबईला, तर शिक्षणाधिकारी दिल्लीला गेलेले आहेत. 
माहिती घेऊन चौकशी करणार 
निलंबित तीन शिक्षकांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत माहिती घेऊन योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख